ETV Bharat / state

अमरावती : विहिरीत पडलेल्या 11 रानडुकरांना मिळाले जीवनदान - 11 रानडुकरांना जीवनदान

अमरावती येथून बचाव पथकही पनपलीया यांच्या शेतात पोहचले होते. यावेळी बचाव पथकाने शर्थीचे प्रयत्न करून 11 रानडुकरांना जिवंत बाहेर काढले तर तीन रान डुकराचे मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले.

विहिरीत पडलेले रानडुकर
विहिरीत पडलेले रानडुकर
author img

By

Published : May 4, 2021, 4:03 PM IST

Updated : May 4, 2021, 4:56 PM IST

अमरावती - पाण्याच्या शोधत भटकत असताना एकूण 14 रानडुकरे चांदुर रेल्वे तालुक्यातील मांडवा परिसरातील एका शेतातील विहिरीत पडले. विहिरीबाहेर निघण्याच्या धडपडीत 3 रानडुकरांनी जीव गमावला आहे, तर वन विभागाच्या बचाव पथकाला 11 रानडुकरांना जीवनदान देण्यात यश आले आहे.

माहिती मिळताच परिसरात खळबळ

चांदुर रेल्वे वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चांदुर रेल्वे वर्तुळात धनापूर येथे नंदकिशोर पनपलिया यांच्या शेतात पाण्याच्या शोधत रानडुकरांचा कळप शिरला आणि त्यापैकी 14 रानडुकरे विहिरीत पडले. याबाबत माहिती परिसरात पसरताच खळबळ उडाल्याचे पहायला मिळाले.

11 रानडुकरांना मिळाले जीवनदान
तीन रानडुकरे दगावली

चांदूर रेल्वे वन परिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांच्या मार्गदर्शनात वर्तुळ अधिकारी किशोर धोत्रे हे ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, माहिती मिळताच अमरावती येथून बचाव पथकही पनपलीया यांच्या शेतात पोहोचले होते. यावेळी बचाव पथकाने शर्थीचे प्रयत्न करून 11 रानडुकरांना जिवंत बाहेर काढले तर तीन रान डुकराचे मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले.

हेही वाचा -भिवंडीत फर्निचरच्या गोदामाला भीषण आग

Last Updated : May 4, 2021, 4:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.