ETV Bharat / state

अमरावतीत बेलोरा विमानतळापुढील वाहनतळाला आग; 10 कार जळून खाक

बेलोरा विमानतळासमोरील वाहनांच्या स्टॉक यार्डला लागलेल्या आगीत 10 कार जळून खाक झाल्या. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. महापालिका अग्निशमन विभागाला आग नियंत्रणात आणण्यासाठी दीड तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

जळून खाक झालेल्या कार
author img

By

Published : Apr 29, 2019, 6:24 PM IST

अमरावती - राष्ट्रीय महामार्गालगतच्या बेलोरा विमानतळासमोरील वाहनांच्या स्टॉक यार्डला लागलेल्या आगीत 10 कार जळून खाक झाल्या. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. महापालिका अग्निशमन विभागाला आग नियंत्रणात आणण्यासाठी दीड तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले. या आगीत सुमारे 50 लाखाच्या कार जळाल्याचा अंदाज अग्निशमन विभागाने वर्तविला आहे.

बेलोरा विमानतळाच्या समोरील संकुलात नवीन, जुने वाहनांचे स्टॉक यार्ड आहे. यात अमरावतीच्या जायका मोटर्स आणि केतन मोटर्स या कार विक्रेत्याचे स्टॉक यार्ड आहे. या स्टॉक यार्डला लागलेल्या आगीत 10 कार जळाल्या. घटनेच्या वेळी यार्डात 100 वाहने होती. मात्र, समयसूचकतेने ही आग आटोक्यात आली. आग कशामुळे लागली, हे तुर्तास कळू शकले नाही. पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या पंचनाम्यातून आगीचे कारण स्पष्ट होईल, असे अग्निशन कर्मचारी विजय पंधेरे यांनी सांगितले.

सायंकाळी 5.45 वाजता लागलेली आग रात्री पावणेआठ वाजताच्या सुमारास तीन बंबाच्या साहाय्याने नियंत्रणात आणल्याची माहितीही त्यांनी दिली.

Intro:अमरावतीच्या बेलोरा विमानतळा समोरील वाहन तळाला लागलेल्या आगीत १० कार जळून खाक

रविवारची रात्रीची घटना;५०लाखाचे नुकसान

अमरावती अँकर
राष्ट्रीय महामार्गालगतच्या बेलारा विमानतळासमोरील वाहनांच्या स्टॉक यार्डला लागलेल्या आगीत १० कार जळून खाक झाल्या. ही घटना रविवारी पावणेसहा वाजताच्या सुमारास घडली. महानगर पालिका अग्निशमन विभागाला आग नियंत्रणात आणण्यासाठी दीड तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले. या आगीत सुमारे ५० लाख रुपये किमतीच्या कार जळाल्या असाव्यात, असा अंदाज अग्निशमन विभागाने वर्तविला आहे.प्राप्त माहितीनुसार, बेलोरा विमानतळाच्या समोरील भागात एका संकुलात नवीन, जुने वाहनांचे स्टॉक यार्ड आहे. यात अमरावतीच्या जायका मोटर्स आणि केतन मोटर्स या कार विक्रेत्याचे स्टॉक यार्ड असून, अचानक लागलेल्या आगीत १० कार जळाल्या. घटनेच्या वेळी यार्डात १०० वाहने होती. मात्र, समयसूचक तेने ही आग आटोक्यात आली. ही आग कशामुळे लागली, हे तूर्तास कळू शकले नाही. पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या पंचनाम्याअंती आगीचे कारण स्पष्ट होईल, असे अग्निशन कर्मचारी विजय पंधरे यांनी सांगितले.
सायंकाळी ५.४५ वाजता लागलेली आग रात्री पावणेआठ वाजताच्या सुमारास तीन बंबाच्या साहाय्याने नियंत्रणात आनली.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.