अकोला - गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेला एक युवक बुडाल्याची घटना घडली. एमआयडीसी ४ मधील खदानीत ही घटना घडली. चंदन मोरे असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु असून, अद्यापही ते सापडले नाहीत.
गरुवारी संत गाडगेबाबा आपत्ती बचाव पथकाचे प्रयत्न अद्यापही सुरुच आहेत. शिवणीतील गणपती मंडळासोबत गणपती विसर्जनासाठी चंदन मोरे हे एमआयडीसी क्रमांक चारमधील खदणीत गेले होते. त्यावेळी ते खदणीत पडले. त्यांच्या मित्रांनी तसेच शोध घेतला मात्र, ते सापडले नाहीत.