अकोला - चंदनपूर येथील तलावात एक तरुण आज रविवारी दुपारी बुडाला. दरम्यान, या तरुणाला तलावातून बाहेर काढत असताना त्याचा मृत्यू झाला. जुबेर खान युसुफ खान असे मृत तरुणाचे नाव आहे.
हिवरखेड येथील युवक जुबेर खान युसूफ खान हा मित्रांसोबत फिरायला गेला होता. दरम्यान, चंदनपूर येथील छोट्या धरणात आंघोळ करत असताना तो बुडाला. त्याच्या मित्रांनी आरडाओरडा करुन मदत मागवली. यानंतर घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी त्याचा शोध घेऊन त्याला बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.