ETV Bharat / state

अल्पवयीन मुलीसोबत विवाह करण्याच्या हट्टापायी तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुलगी अल्पवयीन असल्याने मुलीच्या पालकांचा लग्नाला विरोध होता. परंतु, तरुण अल्पवयीन मुलीसोबत विवाह करण्याचा हट्ट करीत होता. त्यामुळे हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचले.

हिवरखेड पोलीस स्टेशन न्यूज
हिवरखेड पोलीस स्टेशन न्यूज
author img

By

Published : Jan 27, 2021, 10:12 PM IST

अकोला - अल्पवयीन मुलीशी विवाहाचा हट्ट करणाऱ्या तरुणाने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे तरुणाने पोलीस आणि पालकांसमोरच हिवरखेड पोलीस ठाण्यात विष पिले आहे. विकास घनबहाद्दूर असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

हिवरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तळेगाव बाजार येथील विकास बाळकृष्ण घनबहादुर या तरुणाचे गावातीलच एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. दोघांचा प्रेम विवाह करण्याचा मानस असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. परंतु, मुलगी अल्पवयीन असल्याने मुलीच्या पालकांचा लग्नाला विरोध होता. परंतु, तरुण अल्पवयीन मुलीसोबत विवाह करण्याचा हट्ट करीत होता. त्यामुळे हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचले.

हेही वाचा-पुण्यात मध्यरात्री गोळीबार झाल्याने खळबळ, तरुण जखमी

पोलिसांनी समजावूनही तरुणाचा हट्ट

मुलगा मुलगी आणि दोघांचे पालक पोलीस स्टेशनला हजर झाले होते. मुलगी अल्पवयीन असल्याने मुलगी सज्ञान होईपर्यंत कायद्यानुसार विवाह करता येत नाही, असे पोलिसांनी तरुणा समजावून सांगितले. परंतु, प्रेमात आंधळा झालेला तरुण कुणाचीही गोष्ट समजण्याच्या मनस्थितीत नव्हता. शेवटी त्याने टोकाचे पाऊल उचलत पोलीस स्टेशनच्या प्रांगणातच विष पिले. या घटनेने एकच खळबळ उडाली. हिवरखेड पोलिसांनी तात्काळ या तरुणाला प्राथमिक आरोग्य केंद्र हिवरखेड येथे नेले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ अकोला सर्वोपचार रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. याप्रकरणी हिवरखेड पोलीस चौकशी करीत असून कायदेशीर प्रक्रिया सुरू होती.

हेही वाचा-शेळी खरेदी-विक्रीच्या व्यवहारात बनावट नोटा देऊन शेतकऱ्याची फसवणूक, दोघांना अटक

याआधीही दोघांनी केला होता आत्महत्येचा प्रयत्न......
सर्वात धक्कादायक गोष्ट अशी की, या प्रेमीयुगुलाने काही महिन्यांपूर्वीसुद्धा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. परंतु, दैव बलवत्तर म्हणून ते बचावले, अशी चर्चा आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.