ETV Bharat / state

अकोल्यात पूर्ववैमनस्यातून एकाची निर्घृण हत्या

author img

By

Published : Apr 13, 2021, 7:02 PM IST

Updated : Apr 14, 2021, 4:45 AM IST

पूर्ववैमनस्यातून एकाची शेतातच निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. बोरगांव मंजु पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जवळा खुर्द शेतशिवारामध्ये ही घटना घडली. घटनेतील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

एकाची निर्घृण हत्या
एकाची निर्घृण हत्या

अकोला - पूर्ववैमनस्यातून एकाची शेतातच निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना आज उघडकीस आली आहे. बोरगांव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जवळा खुर्द शेतशिवारामध्ये ही घटना घडली आहे. विठ्ठल ठाकरे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. घटनेतील आरोपी योगेश जळमकार याला अटक करण्यात आली आहे.

पूर्ववैमनस्यातून हत्या

टाकळी पोटे येथील योगेश जळमकार आणि मृतक विठ्ठल ठाकरे यांच्यामध्ये वैयक्तिक जुना वाद होता. अशातच सोमवारी त्यांच्यात पुन्हा वाद झाला. हा वाद ग्रामस्थांच्या मध्यस्थीने मिटवण्यात आला होता. मृतक विठ्ठल ठाकरे हे पद्माबाई राऊत यांच्या बटाइने केलेल्या जवळा खुर्द शिवारातील शेतामध्ये भुईमुग व कडाऊ या पिकाची रखवाली करिता रात्री गेले होते. विठ्ठल ठाकरे हे सकाळी घरी परत न आल्यामूळे त्यांचा पुतण्या दत्ता ठाकरे हा शेतामध्ये पाहायला गेला असता त्याला विठ्ठल ठाकरे हे रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आले. त्याने ही माहिती वडील गोविंद ठाकरे यांना माहीती दिली. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष राऊत, बोरगाव मंजू पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील सोळंके, पिंजर पोलिस स्टेशनचे ठाणेदार महादेव पडघान यांनी भेट दिली. पंचनामा करून मृतदेह उत्तरणीय तपासणी करीता सर्वोपचार रुग्णालय येथे पाठविण्यात आला. पोलिसांनी योगेश हरीभाऊ जळमकर यास अटक केली असून त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार सुनील सोळंके करीत आहे.

अकोल्यात पूर्ववैमनस्यातून एकाची निर्घृण हत्या

हेही वाचा : शुभवर्तमान! यंदा मान्सून सामान्य राहण्याचा स्कायमेटचा अंदाज!

Last Updated : Apr 14, 2021, 4:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.