ETV Bharat / state

मन नदीपात्रात आढळले युवक व अल्पवयीन मुलीचा मृतदेह; प्रेमीयुगुल असल्याची चर्चा

बाळापूर येथील मन नदीच्या पात्रात सोमवारी सायंकाळी एक युवक व अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला. हे दोघेही प्रेमीयुगुल असल्याची चर्चा आहे.

author img

By

Published : Jun 30, 2020, 2:19 AM IST

young boy and minor girl death body found in man river akola
मन नदीपात्रात आढळले युवक व अल्पवयीन मुलीचा मृतदेह; प्रेमीयुगुल असल्याची चर्चा

अकोला - बाळापूर येथील मन नदीच्या पात्रात सोमवारी सायंकाळी एक युवक व अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला. हे दोघेही प्रेमीयुगुल असल्याची चर्चा आहे. मृत युवकाचे नाव अक्षय अशोक घरत असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव येथील शिवाजी नगर सुटाळा बु. भागातील अक्षय घरत ( वय. 20) हा मागील दोन दिवसापासून बेपत्ता होता. त्याचा शोध सुरू होता. सोमवारी सायंकाळी त्याचा मृतदेह मन नदी पात्रात आढळला. अक्षयच्या मृतदेहासोबत एका अल्पवयीन मुलीचाही मृतदेह आढळून आला.

तेव्हा पोलिसांनी त्या दोन्ही मृतदेहांना नदी पात्रातून बाहेर काढले व त्याची तपासणी केली असता, पोलिसांना एक मोबाईल मिळाला. या मोबाईलच्या आधारावर या प्रकरणाचा छडा लावण्याचे काम पोलिसांनी सुरू केले. यात दोघेही एकमेकांच्या संपर्कात असल्याचे समजते. यावरून हे दोघेही एकमेकांवर प्रेम करीत असल्याचा अंदाज लावला जात आहे.

दरम्यान, पोलिसांना मुलाची ओळख पटवण्यात यश आले आहे. पण अद्याप मुलगी कुठली आहे. याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी बाळापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरू होती.

हेही वाचा - शेतात कामासाठी गेलेली महिला पुरात गेली वाहून; वडाळी देशमुख गावातील घटना

हेही वाचा - सोयाबीन उगवले नाही म्हणून शेतकरी चढला पाण्याच्या टाकीवर, कंपनीवर कारवाईची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.