ETV Bharat / state

Akola Crime News पतीचा खून करुन भासवला गळफास, पत्नीसह सुपारी किलरच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या - खून करुन भासवला गळफास

अकोल्यातील दहीहांडा गावात दारू पिऊन ( Wife Killed Husband In Akola ) नवरा त्रास देत असल्यामुळे पत्नीने त्याची तीस हजाराला सुपारी दिली. त्यानंतर सुपारी घेतलेल्या आरोपीने तरुणाची हत्या ( Wife Killed Husband With Contract Killer ) करुन आत्महत्या भासवली. मात्र पोलिसांनी पत्नीची कसून चौकशी केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी सुपारी देणारी पत्नी कंचन सचिन बांगर हिच्यासह सुपारीबाज मारेकरी ( Wife Killed Husband And Make Fake Suicide Story ) डिगांबर प्रभाकर मालवेच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Wife Killed Husband In Akola
मृत सचिन घमराव बांगर
author img

By

Published : Dec 30, 2022, 3:36 PM IST

अकोला - दारुड्या पतीचा सुपारी देवून पत्नीनेच काटा ( Wife Killed Husband In Akola ) काढल्याचा प्रकार दहीहंडा पोलिसांच्या तपासात उघड झाला आहे. पोलिसांनी यामध्ये मृतकाची पत्नी व तिला 30 हजार रुपयांसाठी साथ देणाऱ्यास अटक ( Wife Killed Husband With Contract Killer ) केली आहे. सचिन घमराव बांगर असे हत्या करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. ही घटना अकोट तालुक्यातील पुंडा येथे घडली. तर डिगांबर प्रभाकर मालवे असे मारेकरी ( Wife Killed Husband And Make Fake Suicide Story ) आरोपीचे नाव आहे. तर कंचन सचिन बांगर असे सुपारी देणाऱ्या पत्नीचे नाव आहे.

लोखंडी अँगलला गळफास घेतलेला आढळला मृतदेह जिल्ह्यातील दहिहंडा पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम पुंडा येथे सचिन बांगर यांचा व्यायाम करणाऱ्या लोखंडी अँगलला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. ही घटना २८ डिंसेबरला सकाळी उघडकीस आली. दरम्यान, पोलिसांनी मृतदेहासह घटनास्थळाचा पंचनामा ( Wife Killed Husband In Akola ) केला असता सचिनच्या अंगावर जखमा तसेच दोरीने बांधल्याचे वन दिसून आले. पोलिसांना ही आत्महत्या नसून हत्या असावी असा संशय आला. त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केली. वैद्यकीय अहवालासह पोलीस तपासात सचिनची हत्या झाल्याचे समोर आले.

पत्नीनेच हत्येचा कट रचल्याचे पोलीस तपासात उघड तपासावेळी सचिनची पत्नी कंचनची बारकाईने चौकशी करण्यात आली. चौकशीत धक्कादायक बाब उघडकीस आली. पत्नीनेच पती सचिन याच्या हत्येचा कट रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले. सद्यस्थितीत दहीहंडा पोलिसांनी पत्नी कंचन आणि मारेकऱ्याला ( Wife Killed Husband With Contract Killer ) अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास दहीहंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत करीत आहेत.

पत्नीला मारहाण करुन शारीरिक आणि मानसिक त्रास पती सचिन घमराव बांगर पास्टूल येथील रहिवासी असून त्याचा अकोट तालुक्यातील ग्राम पुंडा येथील कंचन हिच्यासोबत विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवस व्यवस्थित गेले. दरम्यान सचिनला दारूचे व्यसन असून व्यसनाआहारी तो पत्नी कंचनला सतत मारहाण करुन शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा. मागील अडीच वर्षापासून कंचन ही माहेरी पुंडा येथे राहायला गेली. दरम्यान, तिथेही पुन्हा सचिनचा त्रास सुरू झाला.

सचिनची दोरीने गळा आवळून हत्या अखेर या सर्व त्रासाला पत्नी कंचन त्रासली होती. तिने पतीचा काटा ( Wife Killed Husband And Make Fake Suicide Story ) काढण्याचा निर्णय घेतला. पुंडा गावातील शेजारी राहणाऱ्या डिगांबर प्रभाकर मालवे याला माझा पती सचिनला जिवे मारून टाक, तुझ्या मुलीलाही त्याचा त्रास आहे, असे म्हटले. याशिवाय ३० हजार रुपये देते, असे आमिषही दिले. त्यानंतर डिगांबरने कंचनच्या राहत्या घरी सचिनची दोरीने गळा आवळून हत्या केली. त्यांनतर त्याचा मृतदेह ( Wife Killed Husband In Akola ) गावाच्या बाहेरील मुलांच्या व्यायाम करण्याच्या लोखंडी अँगलला बांधून लटकवून गळफास घेतला असल्याचे दर्शवून दिले. पोलिसांनी यामध्ये दोघांनाही अटक केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.