ETV Bharat / state

अकोल्यात पावसाची दमदार हजेरी, शेतकरी सुखावला

अकोला - जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना शुक्रवारी रात्री पावसाने हजेरी लावली. या शुक्रवारी रात्रीपासून पडत असलेल्या या मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासारखी स्थिती निर्माण केली आहे.

या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे
author img

By

Published : Jul 27, 2019, 11:58 AM IST

Updated : Jul 27, 2019, 12:24 PM IST

अकोला - जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असतानाच शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासारखी स्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. आज सकाळीही पावसाची रिमझीम सुरुच होती.

अकोल्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची रात्रभरापासून हजेरी, शेतकरी सुखावला

जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस नव्हता. दोन दिवस आधी पावसाने हजेरी लावली. मात्र, या पावसामुळे दुष्काळी परिस्थितीवर मात होईल, अशी परिस्थिती नव्हती. शुक्रवारी रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे जमीन ओली झाली आहे. मात्र, तरीही तरी शेतकऱ्यांना आणखी पावसाची प्रतीक्षा आहे. त्यासोबतच अकोल्याला व मुर्तीजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पातही सव्वातीन दलघमी पाण्याचासाठा असल्याने हा प्रकल्प पूर्ण भरावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून केल्या जात आहेत.

दरम्यान, रात्रीपासून पडत असलेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसाने शेतकरी सुखावला आहे. दुबार पेरणीचे संकट टळले. मात्र, तरी या पावसात पिके चांगली उभी राहतील याची शक्यता कमी आहे. तर हा पाऊस रब्बी हंगामासाठी उपयुक्त ठरेल, असे शेती तज्ञांचे मत आहे.

Intro:अकोला - अकोल्यातील दुष्काळी परिस्थितीची शक्यता असताना काल 27 जुलै रोजी ढगाळ वातावरण होते. परंतु, किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडल्याने या दुष्काळी परिस्थितीला आधार मिळाल्यासारखी भावना व्यक्त केल्या जात होती. मात्र, शुक्रवारी रात्रीपासून पडत असलेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसाने दुष्काळी वातावरणावर मात करण्यासारखी स्थिती निर्माण केली आहे. आज सकाळीही हा पाऊस मध्यम स्वरूपाचा सुरू होता. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे.

Body:जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस नव्हता. दोन दिवस आधी पावसाने हजेरी लावली. परंतु, या पावसामुळे दुष्काळी परिस्थितीवर मात होईल, अशी कुठलीच परिस्थिती नव्हती. त्यामुळे आणखीन आणि जोरदार स्वरूपाच्या पावसाची प्रतीक्षा अकोलेकरांना होती. शुक्रवारी रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे जमीन ओली झाली असली तरी शेतकऱ्यांना आणखीन पावसाची प्रतीक्षा आहे. त्यासोबतच अकोल्याला व मुर्तीजापुर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पातही सव्वातीन दलघमी पाण्याचा साठा असल्याने हा प्रकल्प पूर्ण भरावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून केल्या जात आहे. परंतु, अपुऱ्या पावसामुळे अकोलेकरांचा घसा पावसाळ्यातच कोरडा राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, रात्रीपासून पडत असलेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसाने शेतकरी सुखावला आहे. दुबार पेरणीचे संकट जरी टळले असले तरी या पावसात पिके चांगली उभी राहतील याची शक्यता मात्र कमीच आहे. उलट हा पाऊस रब्बी हंगामासाठी उपयुक्त ठरेल, असे शेती तज्ञांचे मत आहे. या पावसापेक्षा जोरदार पावसाने काही काळ आणखीन हजेरी लावल्यास पाणी प्रश्न सुटेल आणि पीक परिस्थिती ही चांगली राहील.

Conclusion:
Last Updated : Jul 27, 2019, 12:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.