ETV Bharat / state

हरिहर पेठेत पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती; परिसर जलमय

अकोला शहरातील हरिहर पेठ परिसरातील पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीच्या पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत आहे. पाईपलाईनमधील पाणी लिकेज होत असल्याने ते पाणी परिसरातील रहिवाशांच्या घरात साचत आहे.

author img

By

Published : Apr 26, 2019, 12:04 AM IST

हरिहर पेठेतील पाण्याच्या पाईपलाईनमधून होत असलेली गळती

अकोला - शहरातील हरिहर पेठ परिसरातील पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीच्या पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत आहे. पाईपलाईनमधील पाणी लिकेज होत असल्याने ते पाणी परिसरातील रहिवाशांच्या घरात साचत आहे.

हरिहर पेठेतील पाण्याच्या पाईपलाईनमधून होत असलेली गळती

गुडघाभर साचलेले पाणी उपसण्यासाठी येथील नागरिकांना रोज कसरत करावी लागत आहे. या भागाचे नगरसेवक राजेश मिश्रा यांनी यासंदर्भात तक्रारदेखील दाखल केली आहे. मागील चार महिन्यांपासून या गळतीसंदर्भात महानगरपालिकेचा आपत्तीनिवारण विभाग, महापौर आणि आयुक्तांकडे तक्रार नोंदवूनही कुठलीच कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.

एकीकडे भर उन्हाळ्यात पाण्याचा अपव्यय होत आहे. तर दुसरीकडे अकोला शहरातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाई आहे. त्या भागातील नागरिक पाण्याच्या टाकीवर येऊन पाणी भरून घेऊन जातात. हा प्रकार सकाळ, संध्याकाळ नेहमीच पहावयास मिळतो. हरिहर पेठेतील पाण्याच्या टाकीतून हरिहर पेठ, वाशिम बायपास, गीता नगर, गंगानगर यासह आदी भागांमध्ये पाणीपुरवठा केला जातो. गेल्या चार महिन्यांपासून या पाण्याच्या टाकीतील मोठ्या पाईपलाईनमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात निचरा होत आहे. पाईपलाईन नवीन बसवणे अशक्य असले तरी ती दुरुस्त करून पाण्याचा होणारा अपव्यय थांबवता येणे शक्य आहे.

या पाईपलाईनच्या दुरुस्तीचा प्रस्ताव स्थानिक नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीनंतर अजूनपर्यंत तयार झालेला नाही. परिणामी, हे पाणी पाण्याच्या टाकीच्या परिसरात साचत असून परिसरातील नागरिकांच्या घरात जात आहे. पाण्याच्या टाकी शेजारी राहणाऱ्या मकवाना यांच्या घरात अक्षरश: पावसाचे पाणी साचले की काय, असा प्रश्न पडतो. रोज सायंकाळी घरातील पाण्याचा उपसा करताना महिलावर्ग दिसून येतो. हा प्रश्न मनपा प्रशासन आणि महापालिकेतील सत्ताधारी निकाली काढू न शकल्याने स्थानिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे.

Intro:अकोला - हरिहर पेठ मधील पाण्याच्या टाकीतील पाईपलाईनमधील पाणी लिकेज होत असल्यामुळे ते पाणी आवारात आणि शेजारच्या नागरिकांच्या घरात साचत आहे. गुडघ्यावर साचणारे पाणी उपसण्यासाठी शेजाऱ्यांना रोज कसरत करावी लागत आहे. या परिसरातील नगरसेवक राजेश मिश्रा यांनी गेल्या चार महिन्यांपासून या लिकेज संदर्भात मनपा जलप्रदाय विभाग, महापौर आणि आयुक्तांकडे तक्रारी करूनही कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाकडून कुठलीच कारवाई होत नाही आहे. भर उन्हाळ्यात पाण्याचा अपव्यय होत आहे.Body:
अकोला शहरातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाई आहे. त्या भागातील नागरिक पाण्याच्या टाकीवर पाणी भरून घेऊन जातात. हा प्रकार सकाळ आणि संध्याकाळ नेहमीच पहावयास मिळतो. हरिहर पेठमधील पाण्याच्या टाकीतुन मधून हरिहर पेठ, वाशीम बायपास, गीता नगर, गंगानगर यासह आदी भागांमध्ये पाणीपुरवठा केला जातो. गेल्या चार महिन्यांपासून या पाण्याच्या टाकीतील मोठ्या पाईपलाईन मधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात निचरा होत आहे. पाईपलाईन नवीन बसवणे अशक्य असले तरी ती दुरुस्त करून पाण्याचा होणारा अपव्यय थांबवता येणे शक्य आहे. परंतु, या पाईपलाईनचा दुरुस्तीचा प्रस्ताव स्थानिक नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीनंतर ही अजूनपर्यंत तयार झालेला नाही. परिणामी, हे पाणी पाण्याच्या टाकीच्या परिसरात साचत असून परिसरातील नागरिकांच्या घरात जात आहे. शेजारी राहणारे मकवाना यांच्या घरात अक्षरशहा पावसाचे पाणी साचले की काय असा प्रश्न घरात गुडघ्यावर साचलेल्या पाण्याला पाहून पडतो. रोज सायंकाळी घरातील पाण्याचा उपसा करताना महिलावर्ग दिसतात. भर उन्हाळ्यात या पाण्याचा अपव्ययाचा प्रश्न मनपा प्रशासन आणि सत्ताधारी भाजप निकाली काढून न शकल्याने त्यांच्याविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. हाच का भाजपचा विकास असा प्रश्न विचारल्या जात आहे.
एकीकडे ग्रामीण भागात तसेच शहरी भागात घोटभर पाण्यासाठी भटकंती करणारे नागरिक प्लास्टिकची कॅन, भरणे व स्टीलच्या बादल्या घेऊन नागरिक दिसतात. तर दुसरीकडे मुबलक पाणीसाठा असतानाही त्याचा अपव्यय होत असताना हा अपव्यय थांबविण्यासाठी कुठलीच कारवाई होत नसल्याने दिसून येत आहे. यासंदर्भात शिवसेनेचे नगरसेवक राजेश मिश्रा यांनी मनपा आयुक्त, महापौर आणि जलप्रदाय विभाग यांच्याकडे गेल्या चार महिन्यांपासून तक्रारी केल्या आहेत. परंतु, या तक्रारीची दखल अद्यापही कुंभकर्णी झोपेत असलेल्या मनपा प्रशासनाने न घेतल्याने येथील परिस्थिती जैसेथेच आहे.Conclusion:सूचना - सोबत व्हिज्युअल, नगरसेवक बाईट, शेजारी राहणारे मकवाना यांचा बाईट.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.