अकोला - तेल्हारा तालुक्यातील विद्रुपा नदीला आलेल्या पुरात भोकर येथील २० वर्षीय तरुण वाहून गेल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. नितीन सुनिल दामोधर असे या तरुणाचे नाव आहे. या तरूणाचा शोध घेण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.
तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथून जवळच असलेल्या भोकर येथील नितीन दामोधर हा तरुण त्याच्या बकऱ्यांसाठी चारा आणण्याकरता सकाळी विद्रुपा नदीकाठावर गेला होता. पावसामुळे नदीला पूर आल्याने, काठ घसरला. तो काठावर उभा असल्याने तोही घसरला. त्यात तो पुरात वाहून गेला. दरम्यान, त्याचा शोध घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथक शोध घेत आहे. यासोबतच तेल्हारा तहसीलदार, तेल्हारा पोलीस परिश्रम घेत आहेत.