ETV Bharat / state

परसबागेसाठी भाजीपाला बियाणे किट; संचारबंदीत महिला मजुरांनाही मिळाले काम

लॉकडाऊनचा नागरिकांनी सदुपयोग करत घरासमोरील जागेत, तर काहींनी टेरेस गार्डन करून उत्तम प्रकारे परसबागा तयार केल्या आहेत. नागरिकांची ही गरज भागविण्यासाठी महाबीजच्या शिवनीतील बीज प्रक्रिया केंद्राने परसबाग भाजीपाला बियाणे कीट तयार केली आहे. ही कीट शेतकऱ्यांसाठी व बाग तयार करणाऱ्यांसाठीही फायदेशीर आहे.

परसबागेतील भाजीपाला
परसबागेतील भाजीपाला
author img

By

Published : May 7, 2021, 2:22 PM IST

अकोला - कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षभरापासून नागरिक घरातच आहेत. काही नागरिकांनी या वेळेचा सदुपयोग करत घरासमोरील जागेत, तर काहींनी टेरेस गार्डन करून उत्तम प्रकारे परसबागा तयार केल्या आहेत. यादरम्यान, अनेक नागरिक महाबीजच्या शिवनी येथील बीज प्रक्रिया केंद्रांमध्ये जाऊन तेथे रोपटे खरेदी करीत होते. नागरिकांची ही गरज भागविण्यासाठी महाबीजच्या शिवनीतील बीज प्रक्रिया केंद्राने परसबाग भाजीपाला बियाणे कीट तयार केली आहे. ही कीट शेतकऱ्यांसाठी व बाग तयार करणाऱ्यांसाठीही फायदेशीर आहे. त्याबरोबरच यामुळे महिलांनाही दोन महिन्यांचा रोजगार मिळाला आहे. तसेच महाबीजलाही या किटमुळे लाखो रुपयांचे उत्पन्न झाले आहे.

परसबागेसाठी भाजीपाला बियाणे किट

मजुरांनाही काम मिळावे यासाठी परसबाग भाजीपाला बियाणे कीट केली तयार

टेरेस बाग तयार करण्यासाठी नागरिकांनी महाबीजच्या शिवनी येथील बीज प्रक्रिया केंद्र येथे येऊन नर्सरीमधील विविध प्रजातींच्या रोपांची लागवड केली. तर काहींनी भाजीपाला तयार करण्यासाठी बियाणे घेतली. यामुळे महाबीजला फायदा झाला. परंतु, तेथे काम करणाऱ्या महिला मजुरांना रोजगार मिळणे बंद झाले होते. विशेष करून, फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यात या मजुरांना कुठलेही काम नव्हते. त्यामुळे या मजुरांनाही काम मिळावे, परसबाग तयार करणाऱ्यांना देशी भाजीपाला वाणाचे बियाणे उपलब्ध करून द्यावे, शेतकऱ्यांनाही जोडधंदा मिळावा म्हणून भाजीपाला बियाणे कमी दरात उपलब्ध व्हावे या संधीचा फायदा करून महाबीजला उत्पन्न मिळावे. या उद्देशाने शिवनी येथील विभागीय व्यवस्थापक जगदीश खोडक यांनी यासाठी परसबाग भाजीपाला बियाणे कीट तयार केली आहे.

परसबागेसाठी भाजीपाला बियाणे किट
परसबागेसाठी भाजीपाला बियाणे किट

घरी भाजीपाला उगवण्यासाठी फायदेशीर

या किटमध्ये नऊ ते दहा भाजीपाल्याची बियाणे आहेत. हे बियाणे शेतकऱ्यांसाठी उपयोगी असून घरी भाजीपाला उगवण्यासाठी फायदेशीर ठरत आहेत. या किटमध्ये संपूर्ण देशी वाण असल्याने नागरिक व शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. या किटमध्ये पालक, मेथी, मिरची, टोमॅटो, वांगे, दोडका, भोपळा, कोशिंबीर, दुधीभोपळा आदी भाजीपाल्यांची दहा बियाणे उपलब्ध आहेत.

महाबिजला होणार 25 लाखांचे उत्पन्न

महाबीजच्या शिवनी येथील बीज प्रक्रिया विभागाने अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ आणि अमरावती या पाच जिल्ह्यात जवळपास 25 हजार किट तयार करून त्या वितरकांकडे विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे महाबिजला जवळपास 25 लाखांचे उत्पन्न होणार आहे. त्यासोबतच कोरोना काळामध्ये मजुरांनाही रोजगार उपलब्ध करून देण्याचा सुवर्णयोग विभागीय व्यवस्थापक जगदीश खोडके यांनी या माध्यमातून साधला आहे.

हेही वाचा - टोल झोल! कोरोनाच्या एका वर्षात राष्ट्रीय महामार्गावर वाढले 84 टोल प्लाझा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.