अकोला - ग्रामपांचायत निवडणुकीत (Gram Panchayat Election) जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी विरोधी भूमिका घेतली तर पक्ष तुमच्यावर कोणतीच कारवाई करणार नाही. पण येणारा फंड हा तुमच्या नावावर दिल्या जाणार नसल्याची धमकी वजा इशारा ( VBA leader threatens to Activists About Not providing funds if works against the party ) वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष ( Vanchit Bahujan Aghadi District President ) प्रमोद देंडवे यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सभापती पदग्रहण सोहळ्यात पदाधिकाऱ्यांना दिला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषद परिसरात ( Zilla Parishad, Akola )आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. पुढे ते म्हणाले, जर तुम्ही पक्षाच्या विरोधात बंडखोरी करता, ज्या पक्षामुळे तुम्ही मोठे झाले. त्या पक्षाच्या भरोशावर आज तुम्ही पद उपभोगता आणि त्याच लोकांच्या विरोधात तुम्ही जाऊन लढता. हा फार मोठा अपराध तुम्ही करत आहात. हे तुमच्या लक्षात का येत नाही.
मला साहेबांचे आदेश आहेत सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्यानंतर मला रिपोर्टिंग दे, मी कोणाला त्या मतदारसंघात फंड टाकू देणार नाही, असेही जिल्हाध्यक्ष देंडवे ( Vanchit Bahujan Aghadi District President ) यांनी यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांना खडसावून सांगितले. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, येणारा काळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपल्याला ताब्यात घ्यायचा आहे. आज अनेक ग्रामपंचायतीच्या ( Gram Panchayat Election) माध्यमातून अनेक लोकं हे बेताल वागत आहेत. आम्ही खालच्या सदस्यांसाठी काहीच बोलत नाही. पण सरपंच हा वंचितचा असला पाहिजे. येणाऱ्या 266 ग्रामपंचायतीपैकी या जिल्ह्यामध्ये दीडशे ग्रामपंचायतीवर झेंडा लावायचे काम आपल्याला करायचे आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी व्युहरचना ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी फार मोठी रचना आखण्यात आलेली आहे. जरी जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आपली असली, तरी जिल्हा परिषदेचा फंड ग्रामपंचायतमध्ये टाकायचा असला, तरी हा मुख्य उद्देश नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ( Market Committee ) निवडणुकीमध्ये सर्वात जास्त वंचितचे सरपंच निवडून आले तर समितीमध्ये पण आपण आपले सदस्य मोठ्या प्रमाणात निर्माण करू शकू. शेतकऱ्यांनाच नव्हे तर तळागाळातील नागरिकांना समितीच्या माध्यमातून लाभ देऊ शकू. पुढच्या पाच वर्षाच्या निवडणुकीचे उद्दिष्ट समोर ठेवून काम केले पाहिजे. सेवा सहकारी संस्था ही आपण लढलो. कमी दरामध्ये सर्वांना लाभ दिला पाहिजे, हे साहेबांचे स्वप्न आहेत, असेही जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे म्हणाले.
कार्यकर्त्यांचा सन्मान होत नाही, पदाधिकाऱ्यांची नाराजी जिल्हा परिषदेत ( Zilla Parishad, Akola ) ग्रामीण भागातील आलेल्या कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत. त्यांना सन्मानाची वागणूक दिल्या जात नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांचा सन्मान झाला पाहिजे, अशी प्रतिक्रिया माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा इंगळे यांच्यासह इतर काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली.