ETV Bharat / state

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरण : दोषींवर कठोर कारवाईसाठी वंचित बहुजन महिला आघाडीचे राष्ट्रपतींना निवेदन - हाथरस घटनेचा निषेध अकोला बातमी

उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे झालेल्या घटनेचा अकोल्यात वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला. या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशा मागणीचे निवेदन महिला आघाडीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यामार्फत राष्ट्रपतींना देण्यात आले.

वंचित बहुजन महिला आघाडीचे राष्ट्रपतींना निवेदन

author img

By

Published : Oct 1, 2020, 4:16 PM IST

अकोला - उत्तर प्रदेशातील हाथरस येथील 19 वर्षीय तरुणीवर त्याच गावातील चार नराधमांनी अमानुष अत्याचार केल्याची घटना घडली होती. मात्र, उपचारादरम्यान या तरुणीचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटत आहेत. अकोल्यातही वंचित बहुजन महिला आघाडीने आज (गुरुवार) जिल्हाधिकाऱ्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन दिले.

वंचित बहुजन महिला आघाडीचे राष्ट्रपतींना निवेदन

सुरुवातीला आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासदेखील पोलीस टाळाटाळ करत होते. याविरोधात आवाज उठल्यानंतर खूप उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आणि पोलीस प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. या तरुणीला वेळेवर वैद्यकीय मदतदेखील मिळाली नाही. तिला वैद्यकीय उपचार मिळण्यास झालेल्या अडथळ्यांमुळे तिचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह घरच्यांना सुपूर्द न करता पोलिसांनी परस्पर तिच्यावर अंतिम संस्कार केले. ही क्रूर, अमानुष अत्याचाराची घटना आंणि त्यानंतर संपूर्ण शासन व्यवस्थेने तिला मदत देण्यासाठी केलेले असहकार्य, संपूर्ण देशाला आणि भारतीय राज्य व्यवस्थेला लज्जास्पद ठरवणारी आहे.

मनुस्मृतीच्या व्यवस्थेचा पगडा भारतीय समाजातील उच्चवर्णियांवर आजही कायम आहे. त्यामुळे महिला आणि जातीवर आधारित अत्याचार वाढत चालले आहेत. संवैधानिक जबाबदारी पार पाडण्यास नकार देऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार व पोलीस संविधानाशी सातत्याने द्रोह करीत आहेत, असे म्हणत वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला.

या प्रकरणातील दोषींवर व गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन महिला आघाडी, अकोला जिल्हाच्या वतीने राष्ट्रपतींना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले.

हेही वाचा - अमृत योजनेची कामे पूर्ण करा; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मोबाईल टॉवरवर चढून सिनेस्टाइल आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.