अकोला - व्यापारी आणि भाजपधार्जिण्या मोठ्या घराण्यांसाठी हा केंद्रीय अर्थसंकल्प आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केला. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची टीका करत त्यांनी या अर्थसंकल्पाचा निषेध केला.
हेही वाचा - अर्थसंकल्प 2020 : जाणून घ्या 'बजेट'नंतर काय स्वस्त अन् काय महाग ...
'या अर्थसंकल्पामध्ये महागाई, बेरोजगारी आणि सर्वसामान्यांसाठी काहीही नाही. शिवाय जाहीर करण्यात आलेल्या सवलतींची शेतकऱ्यांना गरज नाही,' असे भाष्य पातोडे यांनी केले. शेतकऱ्यांना योग्य हमीभाव दिल्यास हा अर्थसंकल्प योग्य ठरेल, असा सल्लाही त्यांनी दिला.
हेही वाचा - करदात्यांना सरकारचा दिलासा; अशी आहे नवी 'करप्रणाली'