अकोला - भारतीय राज्य घटनेने प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे सरकारने प्रत्येकाच्या धार्मिक भावनेचा आदर करावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
मानव हा उत्सव प्रेमी असून, भावना मारणे चूक आहे. पंढरपूर येथील आंदाेलनानंतर सत्कारात्मक बाबी घडल्यास इतरही धार्मिकस्थळं उघडण्याचा मार्ग माेकळा हाेऊ शकताे. मुळात काेराेनाचा प्रादुर्भाव विदेशातून भारतात झाला असून, हे हाेण्यास प्रामुख्याने प्रथम माेदी सरकारच जबाबदार आहे, असा आराेपही ॲड. आंबेडकर यांनी केला. तसेच एसटी बसेस मध्ये ईपास लागणार नाही, हा आदेश शासनाचा स्वागतार्ह आहे. परंतु, त्याचप्रमाणे शासनाने खासगी वाहतुकीला ही परवानगी देऊन त्यांना ही ईपास बंधनकारक करू नये, असेही ते म्हणाले.
पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदीप वानखडे, जि.प.चे सत्ताधारी वंचितचे गट नेते ज्ञानेश्वर सुलनाते, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डाॅ. प्रसन्नजित गवई आदी प्रामुख्याने उपस्थित हाेते.