अकोला - सीएए व देशाच्या आर्थिक परिस्थितीबाबत वंचित बहुजन आघाडीने आज(शुक्रवार) महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला अकोला शहरामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला असून सकाळी दहा वाजता उघडणाऱ्या बाजारपेठा अद्यापही बंद होत्या.
दरम्यान, वंचितचे पदाधिकारी बाजारपेठ बंद करण्यासाठी फिरत होते. तसेच कोणतीही अनुचित घटना होऊ नये यासाठी पोलिसही मोठ्या प्रमाणात चौका चौकामध्ये तैनात करण्यात आले आहेत. मलकापूर चौकामध्ये वंचितच्या काही पदाधिकाऱ्यांनी रास्तारोको करून तेथे दुकाने बंद केली. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी वंचितचे कार्यकर्ते बंद यशस्वी करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. 3
वंचित बहुजन आघाडीसाठी अकोला हा गड आहे. त्यामुळे या बंदला वंचितचे सर्व पदाधिकारी यशस्वी करण्यासाठी सहभागी झाले होते. जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये आणि शहरामध्ये वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी बंद यशस्वी करण्यासाठी रास्तारोकोसह मोर्चाही काढला होता.
बंद संदर्भातल्या सर्व बातम्या -
मुंबईत वंचित आघाडीच्या बंदला संमिश्र प्रतिसाद; उपनगरात बसवर दगडफेक
Live: घाटकोपरमध्ये 'वंचित'च्या महाराष्ट्र बंदला उस्फूर्त प्रतिसाद तर कुर्ल्यात हिंसक वळण
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर 'वंचित'कडून रास्तारोकोचा प्रयत्न
वंचितचा 'महाराष्ट्र बंद'; अमरावतीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त