अकोला - आज अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या हजेरीने शेतकरी ( Rains hit farmers in Akola district ) त्रस्त झालेले आहेत. शेतात उभा असलेला हरभरा, गव्हाचे पीक खराब होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. हवामान विभागाने दर्शविलेल्या अंदाजानुसार गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते.
वीज पुरवठा खंडित - त्यामुळे नागरिकांना थंडी ऐवजी गर्मीचा अनुभव येत होता. अनेक भागात ढगाळ वातावरणाने पावसाचा ( Rains in Akola district अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान आलेल्या पावसाने हा हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे ( Unseasonal rain in Akola district ) नागरिकांना छत्री रेनकोटचा आधार घ्यावा लागला. बऱ्याच भागात नागरिक ओले होत घरी जात असताना दिसत होते. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे बऱ्याच भागातील वीज पुरवठा ही खंडित झाला होता.
पीक खराब होण्याची भीती - दरम्यान, शेतात उभे असलेल्या गहू, हरभऱ्याला या पावसाची गरज नसतानाही पाऊस पडत असल्यामुळे शेतातील हे दोन्ही पीक खराब होण्याची भीती ( Fear of crop failure due to rain ) शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. आधीच हरभरा आणि गव्हावर आलेल्या किडीमुळे शेतकरी हैराण आहेत. त्यात या पावसामुळे हे पीक आणखीन खराब होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, खरीपामध्ये पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यात हिवाळ्यामध्ये थंडीच्या वातावरणात या अवकाळी पावसाने लावलेली हजेरी ही शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ठरत आहे.