अकोला - जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज सकाळी 31 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 29 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 2 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आठवर पोहोचली आहे.
जिल्ह्यात 3 मे रोजी 15, 4 मे रोजी 9 आणि 5 मे रोजी 11 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यात आज आढळलेल्या दोन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. हे दोन्ही रुग्ण महिला असून त्यातील एक ताजनगर येथील तर दुसरी राधाकिसन प्लॉट येथील रहिवासी आहे. पॉझिटिव्ह अहवाल असलेल्या रुग्णांची एकूण संख्या 77 झाली असून 57 अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. एका ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली.