ETV Bharat / state

ज्या व्यक्तींनी देशासाठी सर्वस्व दिले त्यांना समाज विसरला - तुषार गांधी - akola news

महात्मा गांधींवर अनेक पुस्तके छापली. त्यांचे अनेकांनी जीवन चरित्रही लिहिले पण कस्तुरबा गांधी यांच्या जीवनावर आजवर कोणीच लिहिले नाही. याबद्दल महात्मा गांधीचे पणतू तुषार गांधी यांनी खंत व्यक्त केली.

तुषार गांधी
author img

By

Published : Jul 10, 2019, 10:33 AM IST

अकोला - ज्या व्यक्तींनी देशासाठी संपूर्ण आयुष्य घालविले, त्यांना समाजात स्थान मिळत नाही. समाज त्यांना विसरला आहे. आज आपण आपले कर्तव्य विसरलो असल्याने आपण गांधीजींची टोपी घालण्यास लायक नाहीत. गांधीजींच्या नावाने कोणीही टोपी घालत आहे, मात्र ते लोकांना ओळखता येत नाही, अशी खंत महात्मा गाधींचे पणतू तुषार गांधी यांनी मंगळवारी व्यक्त केली.

महात्मा गांधीचे पणतू तुषार गांधी कार्यक्रमात बोलताना

श्री शिवाजी महाविद्यालयात गांधी अभ्यास केंद्र आणि आम्ही सारे फाउंडेशनद्वारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्त व्याख्यानमालेत ते बोलत होते. या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार अविनाश दुधे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, डॉ. गजानन नारे, डॉ. आनंद काळे, कवी डॉ. विठ्ठल वाघ हे उपस्थित होते.

कस्तुरबा गांधींच्या जीवनपटावर प्रकाश टाकताना तुषार गांधी म्हणाले, महात्मा गांधींवर अनेक पुस्तके छापली. त्यांचे अनेकांनी जीवन चरित्रही लिहिले पण कस्तुरबा गांधी यांच्या जीवनावर आजवर कोणीच लिहिले नाही. याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. लोकांनी आजपर्यंत मला महात्मा गांधींवर व्याख्यान द्यायला बोलावले. त्यात मी 'बा' (कस्तुरबा गांधी) चाही उल्लेख करायचो. पण आज पहिल्यांदा केवळ कस्तुरबा यांच्यावर बोलण्याची संधी मिळते आहे. त्यांच्यासारख्या सामर्थ्यवान, कर्तुत्ववान, सहनशील स्त्रीला आपण सगळेच विसरलो आहोत. कस्तुरबा यांच्या सारखी एक सामान्य निरक्षर स्त्री जेव्हा आपल्या अधिकारांसाठी लढते तेव्हा खऱ्या अर्थाने स्त्री सक्षम झालेली असते, असे सांगताना तुषार गांधी यांनी महात्मा व कस्तुरबा यांच्या नात्यातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकला.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार अविनाश दुधे यांनी संपादित केलेल्या मीडिया वॉच प्रकाशन द्वारे 'गांधी १५०' या शतकोत्तर सुवर्ण मोहत्सवी जयंती विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. अविनाश दुधे यांनी पुस्तकात गांधीजींचे कस्तुरबा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि यांच्याशी असेलल्या संबंधावर प्रकाश टाकला आहे.

Intro:अकोला - ज्या व्यक्तींनी स्वतंत्र देशासाठी अख्ख आयुष्य घालविले त्या पिढीला समाजात स्थान मिळत नाही. त्यांना समाज विसरला आहे.आज आपण आपले कर्तव्य विसरलो असल्याने आपण गांधीजींची टोपी घालण्याचे लायक नाही आहोत. तसेच त्या टोपीचे बदलणारे रूपही आपण बदलताना पाहू शकत नसल्याची खंत तुषार गांधी यांनी आज व्यक्त केली.

Body:श्री शिवाजी महाविद्यालयात गांधी अभ्यास केंद्र व आम्ही सारे फाउंडेशनद्वारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्त व्याख्यानमालेत ते बोलत होते. या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार अविनाश दुधे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, डॉ. गजानन नारे, डॉ. आनंद काळे, कवी डॉ. विठ्ठल वाघ हे उपस्थित होते. कस्तुरबा यांचे आयुष्य आणि कार्यावर प्रकाश टाकताना तुषार गांधी म्हणाले, महात्मा गांधींवर अनेक पुस्तके छापली. त्यांचे अनेकांनी जीवन चरित्रही लिहिले पण कस्तुरबा गांधी यांच्या जीवनावर आजवर कोणीच लिहिले नाही. याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. लोकांनी आज पर्यंत मला महात्मा गांधींवर व्याख्यान द्यायला बोलावले. त्यात मी मध्ये मध्ये 'बा' चाही उल्लेख करायचो. पण आज पहिल्यांदा केवळ बाबर बोलण्याची संधी मिळते आहे. त्यांच्यासारख्या सामर्थ्यवान, कर्तुत्ववान, सहनशील स्त्रीला त्यांचा परिवारच नाही, तर आपण सगळेच विसरलो आहोत. कस्तुरबा सारखी एक सामान्य निरक्षर स्त्री जेव्हा आपल्या अधिकारांसाठी लढते तेव्हा खऱ्या अर्थाने ती सक्षम झाले असते,असे सांगताना तुषार गांधी यांनी महात्मा व कस्तुरबा यांच्या नात्यातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार अविनाश दुधे यांनी संपादित केलेल्या मीडिया वॉच प्रकाशन द्वारे 'गांधी 150' या शतकोत्तर सुवर्ण मोहत्सवी जयंती विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी अविनाश दुधे यांनी पुस्तकात गांधी राहिले नसून ते जगभरात आहे. गांधीजींच्या आणि कस्तुरबा गांधी यांच्या जीवनावर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांच्या संबंधावर ही प्रकाश टाकला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.