ETV Bharat / state

शेतकरी जागर मंचने शहरातून काढली ट्रॅक्टर रॅली - akola breaking news

दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीच्या समर्थनार्थ अकोल्यामध्ये शेतकरी जागर मंचने हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन शहरातून 15 किलोमीटर ट्रॅक्टर रॅली काढली आहे. विशेष म्हणजे, या ट्रॅक्टर रॅलीला काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी पक्षाने पाठिंबा दिला आहे

रॅली
रॅली
author img

By

Published : Jan 27, 2021, 10:00 PM IST

Updated : Jan 27, 2021, 10:22 PM IST

अकोला - दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीच्या समर्थनार्थ अकोल्यामध्ये शेतकरी जागर मंचने हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन शहरातून 15 किलोमीटर ट्रॅक्टर रॅली काढली आहे. विशेष म्हणजे, या ट्रॅक्टर रॅलीला काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी पक्षाने पाठिंबा दिला आहे. या रॅलीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते. ही रॅली मंगळवारी (दि. 26 जाने.) दुपारी नेहरू पार्क चौकातून मार्गस्थ झाली.

शेतकरी जागर मंचने शहरातून काढली ट्रॅक्टर रॅली

दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी कृषी कायद्याविरोधात ट्रॅक्टर रॅली काढली. याला समर्थन देण्यासाठी अकोल्यात ही शेतकरी जागर मंचने ट्रॅक्टर रॅली काढली. या रॅलीमध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले. शेकडो ट्रॅक्टर घेऊन जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले होते. ही रॅली नेहरू पार्क चौक येथून हुतात्मा स्मारकवरुन मार्गस्थ झाली. या रॅलीला काँग्रेसचे नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्तरित्या हिरवी झेंडी दाखविली. त्यानंतर ही रॅली आपल्या प्रवासाला सरकली. जवळपास पंधरा किलोमीटर अंतर कापत ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली. शेकडो ट्रॅक्टर शिस्तबद्ध पद्धतीने या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. कुठलाही अनुचित प्रकार या रॅलीत झाला नाही. या रॅलीला पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. पोलिसांच्या बंदोबस्तात ही रॅली मार्गस्थ झाली.

महिला शेतकऱ्यांनी चालविला ट्रॅक्टर

शेतकरी जागर मंच या रॅलीमध्ये महिला शेतकऱ्यांनीही सहभागी घेतला. ट्रॅक्टर चालवून केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध दर्शविला. शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा मिळवून या महिला शेतकरी ट्रॅक्टर चालवत होत्या. त्यामुळे या महिला शेतकऱ्यांचे कौतुक होत होते.

दहीगाव गावंडे येथे ग्रामस्थांनी काढली गावात ट्रॅक्टर रॅली

अकोला तालुक्यातील दहिगाव गावंडे येथे शेतकऱ्यांनी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्रॅक्टर रॅली काढली. जवळपास पन्नास ट्रॅक्टर या रॅलीत सहभागी झाले होते. गावात चक्कर मारल्यानंतर या रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात रोष व्यक्त करीत केंद्र सरकार विरोधात नारेबाजी केली.

Last Updated : Jan 27, 2021, 10:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.