अकोला - दिवसेंदिवस अकोला जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे. आज (शुक्रवार) प्राप्त झालेल्या कोरोना अहवालात सकाळी 13 तर सायंकाळी 8 असे एकूण 21 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. तसेच 81 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यात जिल्हा कारागृहातील 69 जणांचा समावेश आहे.
आज सायंकाळी प्राप्त अहवालात 8 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात 1 महिला व 7 पुरुष आहेत. त्यातील 4 जण कंवरनगर येथील, तर उर्वरीत बाळापूर, बोरगाव, सिंधी कॅम्प व मोठी उमरी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
आज दुपारनंतर कोविड केअर सेंटरमधून पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात तिघे बाळापूरचे तर दोघे हरिहर पेठ येथील रहिवासी आहेत. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सात जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील दोन जण डाबकी रोड येथील रहिवासी असून उर्वरित वाशीम बायपास, हरिहर पेठ, सिव्हिल लाईन, पातूर व अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच जिल्हा कारागृहातील कोविड केअर सेंटरमधील ६९ जण बरे झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
प्राप्त अहवालानुसार
*प्राप्त अहवाल-२३०
*पॉझिटीव्ह- २१
*निगेटीव्ह- २०९
सद्यस्थिती
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १८२८+२१= १८४९
*मयत-९१ (९०+१)
*डिस्चार्ज- १४५०
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ३०८