अकोला - अकोला - पातूर मार्गावर कापशी ते चिखलगाव दरम्यान प्रवासी वाहन आणि मालवाहू वाहनात आज भीषण अपघात घडला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, सहा जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये बाळू बळीराम कुर्हे, लक्ष्मी वंजारे, चालक संजय राऊत यांचा समावेश आहे. गंभीर जखमी चिमुकली गायत्री ज्ञानू वंजारे हिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा - अकोला ग्रामपंचायत निवडणूक : शांततेत मतदानाला सुरुवात
पातूरवरून अकोल्याच्या दिशेने येत असलेल्या प्रवासी (क्रं. एमएच - 37 - 5381) वाहनाची विरुद्ध दिशेने येत असलेल्या मालवाहू (क्र. एमएच - 30 - एल - 2996) या वाहनाशी समोरासमोर धडक लागल्याने हा अपघात घडला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये चिमुकलीचाही समावेश आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.
गाडी तोडून जखमींना काढले बाहेर
या अपघातात गाडी इतकी क्षतिग्रस्त झाली होती की तिला तोडून जखमींना बाहेर काढावे लागले. नागरिकांनी समयसूचकता दाखवीत जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठविले. या भीषण अपघातानंतर रस्त्यावर गर्दी झाली होती.
हेही वाचा - सुरुवातीला ८९८० फ्रंट लाईन वर्कर्सला देण्यात येईल कोरोना लस - जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण