अकोला - महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने बांधलेल्या गंगानगरमधील बोहरा कॉलनीतील पाण्याची टाकी भरण्यासाठी असलेल्या पाईप लाईनवरील वॉलमधून गळती झाल्यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. पाईपलाईनमधील एअर लिकेज काढण्यासाठी पाणी सोडण्यात आल्याचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी सांगून आपले अपयश लपवित आहे.
हही वाचा - जिल्हा परिषदेच्या मतदानाला सुरुवात, केंद्रांवर मतदारांची गर्दी
महापालिकेकडून गंगानगरमध्ये अनेक वर्षांपासून पाण्याची टाकी बांधण्यात आलेली आहे. या टाकीमध्ये पाणी जमा करण्यासाठी पाईप लाईनही केलेली आहे. ही पाईप लाईन सुरळीत सुरू करण्याऐवजी तिच्यावर अनेक दिवसांपासून टेस्टिंगचे काम सुरू आहे. मात्र, टेस्टिंगसाठी लावण्यात आलेले व्हॉल्व्ह आणि त्यामध्ये जमा होणारी हवा काढण्यासाठी पाण्याचा अपव्यय करण्यात येत आहे. त्या व्हॉल्व्हवर लावलेले कवच पाणी आल्यानंतर निघून जात असल्यामुळे हजारो लिटर पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे पाईप लाईनची टेस्टिंगचा हा प्रकार अकोला महापालिकेला कसा काय सुचला, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.