अकोला - जिल्ह्यात आज सायंकाळी आलेल्या अहवालामध्ये 32 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आला नव्हता. तर, आज दिवसभरात तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 18 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात 32 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यात 11 महिला आणि 21 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील 7 चावरे प्लॉट येथील, 5 बाळापूर येथील, गुलजारपुरा, सिंधी कॅम्प, वाशीम बायपास, मोठी उमरी, तारफैल येथील प्रत्येकी 2 तर उर्वरित शंकरनगर, अकोट फैल, खदान, इंदिरानगर वाडेगाव, डाबकी रोड, आदर्श कॉलनी, महाकाली नगर, खेतान नगर, चांदुर खडकी, खामखेड वाडेगाव रोड येथील प्रत्येकी एक रहिवासी आहेत. आज दुपारनंतर दोघांचा मृत्यू झाला आहे. यातील एक बाळापूर येथील 74 वर्षीय पुरुष आहे. हा रुग्ण 13 जून रोजी दाखल झाला होता. तर अन्य एक बार्शीटाकळी येथील 62 वर्षीय पुरुष आहे. हा रुग्ण 26 मे रोजी दाखल झाला होता.
आज दुपारनंतर 18 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील दोघांना कोविड केअर सेंटर येथे तर उर्वरित 16 जणांना घरी सोडण्यात आले. त्यात नऊ पुरुष व नऊ महिलांचा समावेश आहे. ह्या रुग्णांपैकी खदान येथील तिघे, तारफैल येथील दोघे, खडकी येथील दोघे तर सिंधी कॅम्प, मोहता मिल, मोठी उमरी, बाळापूर, देशमुख फैल, गोरक्षण रोड, दीपक चौक, ध्रुव अपार्टमेंट,जीएमसी होस्टेल, सिटी कोतवाली, अकोट फैल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
*आज प्राप्त अहवाल - १३८
*पॉझिटिव्ह - ३२
*निगेटिव्ह - १०६
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल - १०७३
*मृत - ५६
*डिस्चार्ज - ६७६
*ॲक्टिव्ह रुग्ण - ३४१