अकोला - "वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी अनेक आंदोलने झाली. पण त्यांना यश आले नाही. ते यश मिळवण्यासाठी राजकीय चळवळ उभी करण्याशिवाय पर्याय नाही", असे मत विदर्भ माझा पक्षाचे सरचिटणीस मंगेश तेलंग यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
वेगळ्या विदर्भाची मागणी मागे पडत असून, वेगळा विदर्भ हवा असेल्यास याच मुद्द्यांवर आगामी निवडणूक लढवणे गरजेचे असल्याचे तेलंग म्हणाले. वेगवेगळ्या मुद्द्यांवर नाराज असल्याने पक्ष सोडणाऱ्या नेत्यांनी 'विदर्भ माझा पक्षा'च्या तिकीटावर जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणूक लढवावी, असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले.