ETV Bharat / state

Farmer Suicide : पाळण्याच्या दोरीने गळफास घेऊन युवा शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा

बार्शीटाकळी तालुक्यातील सायखेड येथील युवा शेतकऱ्याने ( By a young farmer ) घरात बाळाच्या पाळण्याच्या दोरीला गळफास (Hang the rope) घेऊन आत्महत्या केल्याची ( End of life journey ) घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नारायण हरिचंद्र पिंपळकर असे त्या शेतकऱ्याचे नाव असुन तो अवघ्या 30 वर्षाचा होता.

author img

By

Published : Jan 8, 2022, 2:17 PM IST

Farmer Suicide
Farmer Suicide

अकोला: त्याने आत्महत्या केल्याचे कळताच घरातील नातेवाईकांनी नारायणला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. या संदर्भामध्ये सायखेड पोलीस पाटील यांनी पोलीसांना माहिती दिली. मृतक शेतकऱ्याचे भाऊ दिनेश पिंपळकर यांनी बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शवविच्छेदना नंतर मृतकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, बहिणी, पत्नी, पाच वर्षाचा मुलगी व सहा महिन्याचा चिमुकला असा आप्त परिवार आहे.

96 हजार रुपयांचे कर्ज

नारायण पिंपळकर यांची आई सुमनबाई यांच्या नावावरील शेतीवर अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक धाबा येथून कर्ज घेतले होते. यातील काही कर्ज हे माफ झाले होते. त्यानंतर त्यांच्या आईने शेतीवरील हक्कसोड करून नारायण पिंपळकर यांच्या नावे दोन एकर शेती केली होती. तेव्हापासून त्यांच्यावर 96 हजार रुपयांचे कर्ज होते. सततची नापिकी, दुष्काळ परिस्थिती, नुकसान यामुळे शेतातील पीक खराब झाले होते. उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे ते मोल मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.

बाळाच्या पाळण्याच्या दोरीने गळफास

नारायण पिंपळकर यांना सहा महिन्याचं बाळ आहे. या बाळाच्या पाळण्याच्या दोरीने त्यांनी गळफास घेतला. घरात कोणी नसल्याचे पाहून त्यांनी गळफास घेतला आहे. कर्जामुळे त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचे बोलल्या जात आहे.

हेही वाचा : Bacchu Kadu Threatened Hemant Deshmukh : 'मी राज्यमंत्री आहे म्हणून सांगा नाहीतर, आत येऊन ठोकले असते'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.