अकोला - जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये बेबी केअर युनिट आहे. या युनिटमध्ये आग लागल्याने किंवा इलेक्ट्रिकमुळे कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी दरवर्षी ऑडिट केल्या जाते. त्यासोबतच युनिटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही त्यासंदर्भात प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती जिल्हा स्त्री रुग्णालयातील बाल रोग तज्ज्ञ डॉ. कमलकिशोर ढोले यांनी दिली.
हेही वाचा - 'भंडाऱ्यातील घटनेची जबाबदारी स्वीकारून आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा'
भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयामध्ये एसएनसीयू युनिट जळाल्याने दहा बालकांचा मृत्यू झाला. अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेनंतर जिल्ह्यातील समान्य रुग्णालयामध्ये असलेले बेबी केअर युनिट खरच सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर अकोला येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या एसएनसीयूची माहिती घेतली असता, त्या ठिकाणी फायर अलार्म सिस्टीम, फायर डिस्ट्रीब्यूशन, स्मोक अलार्म सिस्टीम या सर्व सिस्टीमचे दरवर्षी ऑडिट केले जात असल्याचे समजले. सोबतच येथे असलेल्या इलेक्ट्रिक साधनांचेही ऑडिट केले जात असल्याची माहिती मिळाली.
एसएनसीयू मधील कर्मचाऱ्यांना दिले प्रशिक्षण
आतापर्यंत या जिल्हास्तरीय रुग्णालयातील एसएनसीयुमध्ये कुठलीही छोटी किंवा मोठी घटना घडलेली नाही. रुग्णालयात आग लागणे किंवा इतर दुर्घटना होऊ नये यासाठी युनिटमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. त्यासोबतच या युनिटमध्ये नेहमी बालरोग तज्ज्ञांचे लक्ष असते.
जिल्हा स्त्री रुग्णालयात तीन युनिट
जिल्हा स्त्री रुग्णालयात असलेल्या एसएनसीयुमध्ये तीन युनिट आहेत. इतर युनिटमध्ये दोन युनिट असून येथे स्त्री रुग्णालयातील रुग्णांना ठेवण्यात येते. आऊटर युनिटमध्ये एक युनिट आहे. या ठिकाणी बाहेरच्या नवजात बालकांवर उपचार होतात. या युनिटमध्ये काम करणारे कर्मचारी व बालरोगतज्ज्ञ लक्ष ठेवून आहेत. जिल्हा स्त्री रुग्णालयात असलेल्या युनिटमध्ये अद्यापपर्यंत कुठलीही दुर्घटना झालेली नाही. इथे दुर्घटना होऊ नये याची काळजी कर्मचारी घेत असतात. फायर आणि इलेक्ट्रिकचे नेहमीच ऑडिट होते, अशी माहिती जिल्हा स्त्री रुग्णालयातील बाल रोग तज्ज्ञ डॉ. कमलकिशोर ढोले यांनी दिली.
हेही वाचा - अकोल्यात तीन अट्टल चोरटे जेरबंद; चार लाखांचा मुद्देमाल जप्त