ETV Bharat / state

बोरगावात पोलीस ठाण्याला कोरोनाचा विळखा; दहा पोलीस कर्मचारी पाॅझिटिव्ह

author img

By

Published : Aug 8, 2020, 6:51 PM IST

बोरगाव मंजू पोलीस ठाण्यातील दहा पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्याने इतरही पोलीस कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

अकोला - बोरगाव मंजू येथील पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे. शुक्रवारी तीन पोलीस कर्मचारी पाॅझिटिव्ह निघाले असल्याची माहिती ठाणेदार हरीष गवळी यांनी दिली. त्यामुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. बोरगाव मंजू येथील पोलीस कर्मचाऱ्यांमधील पाॅझिटिव्ह रुग्णांची संंख्या दहावर पोहोचली आहे.

बोरगाव मंजू पोलीस ठाण्यातील दहा पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्याने इतरही पोलीस कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७२ गावे आहेत. तसेच राष्ट्रीय महामार्गावर छोटे-मोठे अपघात होतात. आता येथील नागरिकांनी त्यांच्या समस्या घेऊन पोलिसांकडे कसे जावे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

दरम्यान, गत चार महिन्यांपासून कोरोना संसर्ग एखाद्या वार्डात झाल्यास संपूर्ण परिसर बंद केला जातो. लोकांच्या येण्या-जाण्यावर प्रतिबंध आणला जातो. परंतु, बोरगाव मंजू पोलीस ठाण्यातील एकूण दहा पोलीस कर्मचारी पाॅझिटिव्ह आढळले असले तरी ठाण्यात सर्वसामान्य कामकाज आणि जनतेची वर्दळ दिसून येते, हे कसे काय? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.