अकोला - वन विभाग व मानद वन्यजीव रक्षक बाळ काळने यांनी खरपं गावात एका महिलेच्या घरातून 10 घोरपडी जप्त केल्या. या घोरपडी विकण्यासाठी आणण्यात आल्या असल्याचे समजते. वनविभागाने याबाबत महिलेची विचारपूस करून तिला सोडून दिले. या घोरपड जंगलात सोडून देण्यात आल्या.
पावसाळ्यात घोरपडींची शिकार होते. घोरपड खाण्यास उपयुक्त असून शरीरात होणाऱ्या संधिवातावर उपयुक्त असते, असे म्हणतात. विलुप्त प्रजातीमध्ये घोरपड येते. वन विभागच्या प्रोटेक्शन शेड्युलमध्ये घोरपड येते. पावसाळ्यात घोरपड खाल्ली जाते. घोरपड हजार ते दीड हजारात विकल्या जाते. डोंगराच्या जवळ असलेल्या गावातील हॉटेल आणि धाब्यावर घोरपड सहज विकण्यात येते. त्यामुळे या घोरपडीला पावसाळ्यात मोठी मागणी असते.
खरप गावातील एका महिलेच्या घरात 10 घोरपडी असल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक बाळ काळने यांना मिळाली. त्यांनी वन विभागाचे उपवन सरक्षक सुधीर वळवी व एसीएफ नितीन गोंडाने यांच्या मार्गदर्शनात वन विभागाचे आरएफओ ओवे, वनपाल प्रकाश गीते, वन रक्षक राजेश बिडकर, सरपं, अनिल चौधरी, काटे, म्हातारमारे, शैलेश डोंगरे, यांना सोबत घेऊन महिलेच्या घरी छापा टाकला. या छाप्यात घोरपडी जप्त करत त्यांना जीवदान दिले. त्या महिलेची चौकशी करून तिला ही सोडून देण्यात आले. या घोरपड जंगलात सोडून दिल्या.