ETV Bharat / state

सूर्य ओकतोय आग; अकोल्याचा पारा 46 अंशावर

author img

By

Published : May 23, 2020, 8:22 PM IST

दिवसेंदिवस अकोल्याच्या तापमानात कमालीची वाढ होत आहे. अकोल्याचे तापमान 44.9 अंश सेल्सिअस वरून शुक्रवारी 45.2 अंशावर गेले होते. हेच तापमान आज (शनिवार) .08 अंशाने वाढून ते 46 अंशावर आले आहे.

temperature recorded by akola was 46 degree Celsius
अकोल्याचा पारा 46 अंशावर

अकोला - दिवसेंदिवस अकोल्याच्या तापमानात कमालीची वाढ होत आहे. अकोल्याचे तापमान 44.9 अंश सेल्सिअस वरून शुक्रवारी 45.2 अंशावर गेले होते. हेच तापमान आज (शनिवार) .08 अंशाने वाढून ते 46 अंशावर आले आहे. मे महिन्यातील आजचे तापमान हे सर्वात जास्त आहे. कडक उन्हामुळे अकोलेकरांची लाहीलाही होत आहे.

अकोल्याचा पारा 46 अंशावर
अकोल्याचे तापमान गेल्या आठ दिवसांपासून चढउतार होत आहे. हेच तापमान गुरुवारी किमान 27.6 अंश होते तर सायंकाळी कमाल 44.2 अंश होते. तर शुक्रवारी किमान तापमान 29.9 अंश आणि सायंकाळी कमाल 45.2 अंश होते. ज्याप्रमाणे गुरुवारी .8 अंशाने तापमान वाढले होते. त्याचप्रमाणे आजही तापमानात .08 अंशाने वाढून 46 अंशावर पोहोचले. तापमानातील या वाढीमुळे शिथिल असलेल्या संचारबंदीच्या काळात कामानिमित्त बाहेर पडलेल्या अकोलेकरांना उन्हाचा तडाखा बसला आहे. एकप्रकारे अकोल्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना उन्हाचाही तडाखा वाढत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.