ETV Bharat / state

अकोल्यात आढळला कोरोनाचा संशयित रुग्ण; सर्वोपचार रुग्णालयात दाखल

author img

By

Published : Mar 7, 2020, 9:58 PM IST

आयसोलेशन वॉर्डात दाखल होताच रुग्णाच्या घशातील श्वासाचे नमुने घेण्यात आले. हे नमुने तपासणीसाठी तत्काळ पुण्याला पाठविण्यात आले आहेत. नमुन्यांचा तपासणी अहवाल येण्यास दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. अहवाल आल्यानंतर पुढील उपचार करण्यात येतील, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांनी सांगितले आहे.

corona suspect akola
सर्वोपचार रुग्णालय

अकोला - शहरात कोरोनाचा संशयित रुग्ण आढळला आहे. महिला रुग्ण दोन दिवसाआधी जर्मनीतून अकोल्यात परतली होती. मात्र, घरी तिची प्रकृती बिघडल्याने तिला सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले आहे. तिच्या घशातील श्वासाचे नमुने तापसणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

मूळची अकोल्यातील रहिवाशी असलेली २४ वर्षीय तरुणी ही जर्मनीला नोकरीसाठी गेली होती. दोन दिवसांपूर्वी ती जर्मनीवरून भारतात पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. यानंतर ती थेट अकोल्यात पोहोचली. घरी आल्यावर तरुणीला ताप येण्यास सुरुवात झाली. प्रकृती खालावत असल्याने आपल्याला कोरोनाची लागण तर झाली नाही ना? असा संशय आल्याने शनिवारी तिने थेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना आयसोलेशन वॉर्डात धाव घेतली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळल्याने तरुणीवर उपचार सुरू केले आहे. सध्या तरुणीची प्रकृती स्थिर असून तिला प्राथमिक उपचार दिले जात आहे.

आयसोलेशन वॉर्डात दाखल होताच रुग्णाच्या घशातील श्वासाचे नमुने घेण्यात आले. हे नमुने तपासणीसाठी तत्काळ पुण्याला पाठविण्यात आले आहेत. नमुन्यांचा तपासणी अहवाल येण्यास दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. अहवाल आल्यानंतर पुढील उपचार करण्यात येतील. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठता डॉ. शिवहरी घोरपडे यांनी केले आहे.

हेही वाचा- वेतन द्या! ..अन्यथा शिक्षण विभागासमोर पत्नीसह आत्महत्या करेन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.