अकोला - प्रतिकूल परिस्थितीतही यशोशिखर गाठणार्यांच्या मुलां-मुलींमध्ये अकोट फैलच्या लाडीसफैलमधील एका मुलीने ( Success Story of Sujata Tayade ) आपले स्थान निर्माण केले आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी घेण्यात येणार्या निट परिक्षेत तिने अनुसूचित जाती प्रवर्गामधून राज्यात 266 वा रँक मिळविला आहे. तिने तिच्या परिश्रमातून हे यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे तिचे सर्वत्र कौतूक होत आहे. सुजाता मोहन तायडे असे त्या मुलीचे नाव आहे. सुजाताने निटचा अभ्यास करण्यासाठी कुठल्याही प्रकारची खासगी शिकवणी वर्ग लावले नाही. तिची तशी परिस्थिती ही नव्हती. अशावेळी तिला युट्यूब हेच तिच्यासाठी खासगी शिकवणी वर्ग ठरले आहे. त्यावरून तिने नीट परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
शिक्षणाच्या प्रवाहात वाहत असताना श्रीमंतांचीच मुले आघाडीवर असतात, असे नाही. त्यांच्या सरसही गरीब घरातील मुलेमुली असतात. परंतु, त्यांना त्यांच्या घरच्या परिस्थितीमुळे संधी मिळत नाही. ज्यांना संधी मिळते किंवा जे संधी मिळविण्यासाठी धडपड करतात असे मुलेमुली यशोशिखर गाठतात. अशाच प्रकारचे उदाहरण समाजामध्ये निर्माण करण्याचे काम केले आहे सुजाता मोहन तायडे या मुलीने. वैद्यकीय शिक्षणासाठी घेण्यात येणार्या प्रवेश परिक्षेत म्हणजेच निट परिक्षेत सुजाताने 700 गुणांपैकी 512 गुण घेऊन वैद्यकीय शिक्षणात प्रवेश मिळविला आहे.
सुजाताचे वडील हे रस्त्यावर पोथ गठाईचे काम करतात. त्यामुळे घरची परिस्थिती जेमतेम आहे. भावंडांच्याही शिक्षणाचा खर्च त्यांच्यावर आहे. आईही या कुटुंबाला हातभार लावते. घरातील हलाखीची परिस्थिती असतानाही दहावीमध्ये 73 टक्के गुण तर बारावीमध्ये 56 टक्के गुण तिने मिळवले होते. तिने कुठल्याही खासगी शिकवणी न करता तिने हे यश गाठले. हुशार असणार्या सुजाताने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने निटचा अभ्यास केला. तिने यासाठी सेल्फ स्टडीचा उपयोग केला. सेल्फ स्टडीमधून तिला जे जमले ते तिने केले. पण जे तिला येत नव्हते त्याचा अभ्यास तिने युट्यूबमधून पूर्ण केला. त्यामुळे तिने नीट परीक्षा उत्तीर्ण केली.
वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. हे ध्येय गाठण्यासाठी सुजाताने इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये चांगले गुण घेतले. त्यानंतर तिने वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशपुर्व परिक्षा (नीट) दिली. यामध्ये ती अनुसूचित जाती प्रवर्गामधून राज्यामध्ये 700 पैकी 512 गुण घेऊन राज्यात 266 व्या क्रमांकावर आली आहे. तिने हे यश संपादन करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आईवडील व मार्गदर्शकांना दिले आहे.
हेही वाचा - Sanjay Raut On Mahatma Gandhi : "...तर त्यांनी गांधींना नव्हे तर जिनांना गोळ्या घातल्या असत्या"