ETV Bharat / state

गावठी दारू अड्ड्यावर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, आरोपी मात्र फरार - State Excise Department Action

लोहारा येथील ग्रामीण भागात गावरान दारू तयार करण्याच्या गुत्यांमध्ये वाढ झाली आहे. तर दारूमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. याची दखल घेत अकोला येथील राज्य ऊत्पादन शुल्क विभागाच्या अधीकार्‍यांनी लोहारा येथील मन नदिकाठावरील एका शेतात गाळून ठेवलेले दारूचे १५ डब्बे उद्ध्वस्त केले.

illegal wine
गावठी दारू अड्ड्यावर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, आरोपी मात्र फरार
author img

By

Published : Feb 26, 2020, 4:24 PM IST

अकोला - उरळ पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या लोहारा परिसरात अवैधरित्या गावठी दारू भट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून गावठी दारूची भट्टी उद्ध्वस्त केली. विशेष म्हणजे, उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुलेआम सुरू असलेली ही भट्टी पोलिसांच्या निदर्शनात का आली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

गावठी दारू अड्ड्यावर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, आरोपी मात्र फरार

हेही वाचा - भिवंडीत 'तिहेरी तलाक'चा चौथा गुन्हा दाखल, हुंड्यासाठी दिला तलाक

लोहारा येथील ग्रामीण भागात गावरान दारू तयार करण्याच्या गुत्यांमध्ये वाढ झाली आहे. तर दारूमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. याची दखल घेत अकोला येथील राज्य ऊत्पादन शुल्क विभागाच्या अधीकार्‍यांनी लोहारा येथील मन नदिकाठावरील एका शेतात गाळून ठेवलेले दारूचे १५ डब्बे उद्ध्वस्त केले. हजारो रुपये किमतीच्या दारूची व मोहाची नासधूस केली.

आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना या गावराण भट्टीचा शोध लागला. पण उरळ पोलिसांना साधी याची कल्पना देखील नसणे ही एक आश्चर्याची बाब असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

हेह वाचा - रेती तस्करांची दादागिरी...कारवाईसाठी गेलेल्या पथकाला धक्काबुक्की

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.