ETV Bharat / state

Split In Thackeray Group: अकोल्यात ठाकरे गटाला धक्का; माजी जिल्हा प्रमुखांचा शिंदे गटात प्रवेश

Split In Thackeray Group: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील गळती सुरूच आहे. याच ओळीत आता अकोल्यातील माजी जिल्हा प्रमुख श्रीरंग पिंजरकर (Shrirang Pinjarkar) आणि संतोष अनासाने (Santosh Anasane) यांचे नाव जोडले गेले आहे. (Former district head of Thackeray group) या दोघांनी त्यांच्या समर्थकांसह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Split In Thackeray Group
ठाकरे गटात फूट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 8, 2023, 4:01 PM IST

Updated : Nov 8, 2023, 4:40 PM IST

ठाकरे गटाचे अकोला जिल्हाप्रमुख आता शिंदे गटात सहभागी

अकोला Split In Thackeray Group: शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख श्रीरंग पिंजरकर आणि संतोष अनासाने यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेना गटात पक्ष प्रवेश केला आहे. मुंबईत हा पक्षप्रवेश खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झाला आहे. दरम्यान, या राजकीय उलथापालथमुळे, अकोल्यातील ठाकरे गटाला चांगलाच धक्का बसला आहे.

ठाकरे गटातील कार्यकर्ते शिंदे गटात : शिवसेना पक्षात दोन गट निर्माण झाल्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे ठाकरे गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते अजूनही शिंदे गटात जात असल्याचे चित्र आहे. ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख श्रीरंग पिंजरकर, संतोष अनासाने यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. माजी जिल्हा प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांचा जिल्ह्यात चांगला संपर्क आहे. बोरगाव मंजू विधानसभा मतदारसंघातून ते शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणुकीत उभे होते. त्यांचा संपर्क आता शिंदे गटाला वाढविण्यात ठरेल.

आमदार बाजोरियांचा यापूर्वीच प्रवेश : याआधी माजी आमदार गोपिकिशन बाजोरिया, त्यांचे पुत्र आमदार विपल्व बाजोरिया यांच्यासह आदी पदाधिकारी यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर अकोल्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा शरद पवार यांच्या अगदी निकट असलेले रामेश्वर पवळ यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. यानंतर आता माजी जिल्हा प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांच्यासह आदी पदाधिकारी यांनी पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना शिंदे गटाचे प्रदेश राज्य समन्वयक रामेश्वर पवळ यांच्या उपस्थितीत झाला.

विदर्भात पक्ष वाढीला जोमाने सुरुवात : जनहितासाठी सतत कार्यरत असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील विविध विकासकामे वेगाने मार्गी लागत आहेत. मुख्यमंत्री महोदयांच्या या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन राज्यातून विविध पक्षाचे, संघटनेचे कार्यकर्ते शिवसेनेची जोडले जात आहेत. अकोला जिल्ह्याचे १९ वर्ष जिल्हाप्रमुख आणि उपमहापौर पद भूषविलेले श्रीरंग पिंजरकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे विदर्भात पक्ष वाढीला जोमाने सुरुवात झाली आहे.

हेही वाचा:

  1. chhagan bhujbal on Maratha reservation: 2 दिवसांत कुणबी नोंदीचा आकडा कसा वाढला-छगन भुजबळ यांचा मराठा आरक्षणावरून सवाल
  2. Thackeray vs Shinde : राज्य सरकार घटनाबाह्य, यावरच बुलडोजर फिरवण्याची गरज- खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल
  3. Manoj Jarange On OBC : ओबीसी नेत्यांमुळे चाळीस वर्षे आमच्यावर अन्याय, तर मराठा नेत्यांमुळे नुकसान; मनोज जरांगेंचा हल्लाबोल

Last Updated : Nov 8, 2023, 4:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.