ETV Bharat / state

अकोल्यात परतीच्या पावसाचा सोयाबीन पिकाला फटका, कवडीमोल भावात होतेय विक्री

खराब झालेल्या सोयाबीनमुळे शेतकरी चिंतीत.. सर्वांना अन्न पुरविणारा बळीराजा आर्थिक संकटात सापडल्याने शासनाने मदत करण्याची मागणी..

अकोल्यात परतीच्या पावसाचा सोयाबीन पिकाला फटका
author img

By

Published : Nov 11, 2019, 5:32 PM IST

अकोला - राज्यात झालेल्या परतीच्या पावसाचा शेतीवर विपरीत परिणाम झाला आहे. परतीच्या पावसामुळे खराब झालेले सोयाबीन अकोल्यातील शेतकऱ्यांनी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाफेड केंद्रावर आणून टाकले आहे. सोयाबीनला असलेल्या हमीभावापेक्षाही अर्ध्या भावात पीक विकण्यास शेतकरी तयार झाला आहे. यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांला शासनाकडून आता मदतीची अपेक्षा आहे.

अकोल्यात परतीच्या पावसाचा सोयाबीन पिकाला फटका

हेही वाचा... दिवाळीतही वाहन उद्योगावर मंदीचा प्रभाव; ऑक्टोबरमध्ये विक्रीत १२.७६ टक्के घसरण

दिवाळीनंतर झालेल्या परतीच्या पावसामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलेच नुकसान सहन करावे लागत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चांगले उत्पन्न मिळण्याच्या आशेवर सोयाबीन, कपाशी, ज्वारी व बाजरी या पिकांची पेरणी केली होती. परिणामी परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये सोयाबीन, ज्वारी व कापूस या पिकाची काढणी करीत असतानाच धो-धो पाऊस पडला. काढणीला आलेले पीक शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर ओले होऊन खराब झाले. खराब झालेले सोयाबीन विकायचे कुठे? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला होता. शेतकऱ्यांनी अकोला शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आपले खराब झालेले सोयाबीन आणले. यानंतर पेरणी करत असताना आलेला खर्च वजा करता काहीच उत्पन्न न मिळवता खराब झालेले सोयाबीन शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अतिशय कमी भावांमध्ये विकत आहे.

हेही वाचा... हैदराबादच्या काचीगुडा स्थानकाजवळ 'करनूल इंटरसिटी'ची एमएमटीएसला धडक; 10 प्रवासी गंभीर

शेतकरी बाजार समितीमध्ये या वर्षी 1500 ते 2000 रुपये प्रति क्विंटल भावाने खराब झालेले सोयाबीन विकत आहेत. नाफेड येथे सोयाबीनचा हमीभाव चांगला 3700 पर्यंत आहे, परंतु हा भाव नाफेडचा चांगल्या प्रतिच्या सोयाबीनसाठी आहे. यामुळे खराब सोयाबीनला काहीच भाव मिळत नसल्याचे पहायला मिळत आहे. खराब झालेल्या सोयाबीनमुळे यावर्षी शेतकरी बहाल झाला असून शासन या शेतकऱ्यांना मदत करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Intro:अकोला - परतीच्या पावसामुळे खराब झालेले सोयाबीन शेतकऱ्यांनी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाफेड केंद्रावर आणून टाकले आहे ओलसर आणि कॉम आलेले हे सोयाबीन बाजार समितीच्या आवारात वाढण्यासाठी ठेवण्यात आले आहे काळपट झालेल्या या सोयाबीनचा दुर्गंधी सुटली असून या सोयाबीनचा हमीभाव यापेक्षाही अर्ध्या भावात विकण्यास शेतकरी तयार झाला आहे आर्थिक संकटात सापडलेल्या या शेतकऱ्याला शासनाकडून आता मदतीची अपेक्षा आहे.Body:दिवाळीनंतरच्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलेच नुकसान पोहोचले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चांगले उत्पन्न मिळण्याच्या आशेवर सोयाबीन, कपाशी , ज्वारी व बाजरी या पिकाची पेरणी केली होती. परिणामी परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, यामध्ये सोयाबीन ,ज्वारी व कापूस या पिकाची काढणी करीत असतानाच धो-धो पाऊस पडला, काढणीला आलेले पीक शेतकऱ्यांन च्या डोळ्यासमोर ओले होऊन खराब झाले. डोळ्यासमोर खराब होत असलेले सोयाबीन चे दाणे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू हे थांबे नासे झाले होते. परिणामी पावसाने काही दिवसानंतर विश्रांती घेतली शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पुन्हा जाऊन पाहणी केली असता सोयाबीनच्या दाण्यांना अक्षरशः कोंब फुटले होते, आता हे खराब झालेले सोयाबीन विकायचे कुठे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला होता. शेतकऱ्यांनी अकोला शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आपले खराब झालेले सोयाबीन आणले, पेरणी करीत असताना आलेला खर्च वजा करता काहीच उत्पन्न न मिळवता खराब झालेले सोयाबीन शेतकरी हे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अक्षरशहा कमीत कमी भावांमध्ये विकत आहे,

बाजार समिती मध्ये या वर्षी 1500 ते 2000 रुपये प्रति क्विंटल भावाने खराब झालेले सोयाबीन विकत आहेत, नाफेड येथे सोयाबीन चा हमीभाव चांगला 3700 परेंत आहे, परंतु हा भाव नाफेड चा चांगल्या क्वालिटी च्या सोयाबीन चा आहे, सध्या स्थितीत अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खराब सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून या सोयाबीनला सुकवण्यासाठी अडत व्यावसायिक व शेतकरी यांनी आपले प्रयत्न सुरू केले आहे .कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये प्रवेश करतात चोहिकडे सोयाबीनचे मोठं मोठे ढीग पाहायला मिळतात. या सोयाबीनला शेतकऱ्यांना काहीच भाव न मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे .

खराब झालेल्या सोयाबीन मुळे यावर्षी शेतकरी बहाल झाला असून शासन या शेतकऱ्यांना मदत करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . सगळ्यांना अन्न पुरविणारा आपला बळीराजा यावर्षी खूप आर्थिक संकटात सापडलेला आहे, या आर्थिक संकटाला जिल्हा प्रशासन तसेच शासन कितपत मदत करणार याकडेच शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

बाईट :- अनिल श्रीनाथ (अल्प भूधाराक शेतकरी)
बाईट :- अतुल सौंदळे ( शेतकरी)
बाईट :- प्रदीप पोहरे ( अडत व्यावसायिक)
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.