ETV Bharat / state

अकोल्यात पिंपळखुटा शिवारात मृतावस्थेत आढळले पक्षी, नमुने तपासणीसाठी पाठवले हैदराबादच्या प्रयोगशाळेत - birds found dead

अकोला जिल्ह्यातील पिंपखुटा-गोरवा रस्त्यावर काही पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत. यामध्ये सहा मोर, सात लांडोर, दोन चिमण्या व तीन टिटव्यांचा समावेश आहे. या सर्व पक्षांचे नमुने तपासणीसाठी हैदराबादला पाठवण्यात आले आहे.

अकोल्यात पक्षी मृतावस्थेत आढळले ,  अकोला मृत पक्षी ,  अकोला बर्ड फ्लू ,  birds dead ,  birds found dead ,  akola latest news
अकोला
author img

By

Published : May 18, 2021, 10:28 AM IST

अकोला - बार्शीटाकळी तालुक्यातील पिंपळखुटा – गोरवा रस्त्यावरील शेताच्या बाजुस एका तलावाजवळ सहा मोर, सात लांडोर, दोन चिमण्या व तीन टिटव्या मृतावस्थेत आढळून आले आहेत. या पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी हैदराबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. या पक्ष्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे अहवालावरून स्पष्ट होणार आहे.

या घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक अर्जुना के. आर व सहाय्यक वनसंरक्षक वने सुरेश वडोदे, वनपरिक्षेत्र अधिकारी डांगे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तालुका पशुधन अधिकारी डॉ. वर्षा चोपडे, प्रभारी वनपाल पी. डी पाटील यांचा सहभाग होता. मृत्युमुखी पडलेल्या पक्ष्यांची शिकार झाली कि अज्ञात आजाराने त्यांचा मृत्यू झाला याचा उलगडा अद्याप झाला नाही. मृत पक्षांचे शवविच्छेदन करण्याकरीता ते फॉरेन्सिक लॅब हैदराबाद येथे पाठविण्यात आले आहे. या घटनास्थळावर गहू आढळून आले असून त्याचे सुद्धा नमुने तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत, असे उपवनसंरक्षक के.आर.अर्जूना यांनी सांगितले आहे.

या पक्ष्यांच्या मृत्यूने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुन्हा बर्ड फ्ल्यूची शक्यता यानिमित्ताने निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे या पक्षांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा - मुंबईत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी; केईएम रुग्णालयात ३६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.