ETV Bharat / state

अकोल्यात मटणाच्या फोडीवरुन शिवसैनिकांमध्ये हाणामारी - Bjp mla Harish pimpale

शिवसैनिकांमध्ये मटणाच्या फोडीवरून हाणामारी झाल्याची घटना जिल्ह्यातील बार्शीटाकळी येथे घडली. मूर्तिजापूरचे भाजपचे आमदार हरिष पिंपळे यांच्याविरोधात शिवसैनिकांनी मेळावा आयोजीत केला होता.

मटणाच्या फोडीवरुन शिवसैनिकांमध्ये हाणामारी
author img

By

Published : Sep 23, 2019, 4:24 PM IST

Updated : Sep 23, 2019, 4:35 PM IST

अकोला - शिवसैनिकांमध्ये मटणाच्या फोडीवरून हाणामारी झाल्याची घटना जिल्ह्यातील बार्शीटाकळी येथे घडली. मूर्तिजापूरचे भाजपचे आमदार हरिष पिंपळे यांच्याविरोधात शिवसैनिकांनी मेळावा आयोजीत केला होता. या मेळाव्यादम्यान ही घटना घडली. काही वेळानंतर पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढून प्रकरण शांत केले.

बार्शीटकळी तालुक्यात शिवसेनेने मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांच्या विरोधात एल्गार पुकारण्यात येऊन त्यांना विरोध करण्यात आला. दुसरा उमेदवार द्यावा, असा सूर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये निघत होता. यावेळी जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेवराव गवळे, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य बंडू ढोरे यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांनी भाषण ठोकले.

अकोल्यात मटणाच्या फोडीवरुन शिवसैनिकांमध्ये हाणामारी

कार्यक्रमानंतर जेवणाची मेजवानी होती. कार्यकर्त्यांसाठी जेवणासाठी मटण ठेवण्यात आले होते. याच मटणासाठी शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झुंबड उडाली. यादरम्यान ताटात असलेल्या मटणाच्या फोडीवरून शिवसैनिकांमध्ये वादंग झाले. याचे रुपांतर हाणामारीत झाले. शिवसेना जर एक मटणाच्या फोडीवर मत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे यावरून दिसते. तर शिवसेनेची मूर्तिजापूर मतदारसंघात काय किंमत आहे, हे यावरून दिसते. शिवसेना अशा प्रकारे मत मागत असेल आणि भाजपचे विद्यमान आमदार पिंपळे यांच्या विरोधात शिवसेनेचे हे षडयंत्र असल्याचे स्पष्ट होते.

Intro:अकोला - मूर्तिजापूरचे भाजपचे आमदार हरिष पिंपळे यांच्याविरोधात शिवसैनिकांची रविवारी दुपारी बैठक झाली. या बैठकीत मान्यवरांची भाषणे झाल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात मात्र शिवसैनिकांमध्ये जेवणाच्या ताटात असलेल्या मटणाच्या फोडीवरून वादंग झाला. हाणामारीत रूपांतर झाल्यानंतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढून प्रकरण शांत केले. Body:बार्शीटकळी तालुक्यात शिवसेनेने मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांच्या विरोधात एल्गार पुकारन्यात येवून त्यांना विरोध करण्यात आला. दुसरा उमेदवार द्यावा असा सूर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये निघत होता. यावेळी जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेवराव गवळे, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य बंडू ढोरे यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांनी भाषण ठोकले. कार्यक्रमानंतर जेवणाची मेजवानी होती. कार्यकर्त्यांसाठी चार बोकडांचं मटन ठेवण्यात आलं होतं. याच मटनासाठी शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झुंबड झाली आणि याच पर्यवसान हाणामारीत झालं. शिवसेना जर एक मटणाच्या फोडीवर मत घेण्याचापर्यंत करत असल्याचे यावरून दिसते. तर शिवसेनेची मूर्तिजापूर मतदार संघात काय किंमत आहे, हे यावरून दिसते. शिवसेना अश्या प्रकारे मत मागत असेल आणि भाजपचे विद्यमान आमदार यांच्या विरोधात हे तिकिटासाठी शिवसेनेचे षडयंत्र आहे , हे स्पष्ट होत आहे.Conclusion:
Last Updated : Sep 23, 2019, 4:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.