अकोला : नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले ( Shiv Sena Rastra roko Protest in Akola ) आहे. या नुकसानीची भरपाई, पीक विमा देणे यासह आदी मागण्यांसाठी शिवसेनेने जिल्ह्यातील41 ठिकाणी रास्तारोको आंदोलन सुरू केले आहे. तर मूर्तिजापूर येथील या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले ( Crop insurance office vandalized in Murtijapur ) आहे. येथील उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पीक विमा कार्यालयात तोडफोड केली.
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान : पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जोरदार पाऊस पडल्यामुळे काढणीला आलेले पीक खराब झाले ( farmers Loss due to natural climate ) आहे. त्यासोबतच पावसाचे पाणी शेतात असल्यामुळे हजारो एकर जमिनीवरील पिके खराब झाली आहे. पिक विमा काढूनही विमा देण्यात आला नाही. नुकसान भरपाईची अजूनही रक्कम मिळाली नाही. पावसामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानामुळे जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. मात्र, शासनाकडून मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्या सोबतच कपाशीवरील बोंड आळी यामुळेही शेतकरी हैराण आहे. परिणामी, शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पिक विमा द्यावा व ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शिवसेनेने जिल्ह्यात 41 ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले ( Agitation turns violent in Murtijapur ) आहे. जिल्हाध्यक्ष तथा आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये हजारो शिवसैनिक सर्वच आंदोलनाच्या ठिकाणी आंदोलनात सहभागी झाले आहेत.
मूर्तिजापूर येथील पीकविमा कार्यालयात तोडफोड : मूर्तिजापूर येथील कार्यालयात उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तोडफोड करीत या आंदोलनाला हिंसक वळण दिले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी कार्यालयातील खुर्च्या फेकफाक करीत तिथे तोडफोड केली. तसेच जोरदार नारेबाजी ही केली.