ETV Bharat / state

Diwali festival : दिवाळी किट न दिल्याने शिवसेनेचे जिल्हा पुरवठा विभागात ठिय्या आंदोलन - District Supply Department

राज्य सरकारने दिवाळीत ( Diwali kit ) गरिबांना शंभर रुपयांत तेल, रवा, डाळ, साखर या वस्तू देण्यात येणार होत्या. दिवाळी दोन दिवसांवर ( Diwali festival ) आली, मात्र अजूनपर्यंत गरिबांना हे साहित्य ( Demand for ration to the poor ) देण्यात आले नाही.

Diwali festival
दिवाळी किट न दिल्याने शिवसेनेचे जिल्हा पुरवठा विभागात ठिय्या आंदोलन
author img

By

Published : Oct 20, 2022, 6:24 PM IST

अकोला : राज्य सरकारने दिवाळीत ( Diwali kit ) गरिबांना शंभर रुपयांत तेल, रवा, डाळ, साखर या वस्तू देण्यात येणार होत्या. दिवाळी दोन दिवसांवर ( Diwali festival ) आली, मात्र अजूनपर्यंत गरिबांना हे साहित्य ( Demand for ration to the poor ) देण्यात आले नाही. त्यामुळे, शिवसेनेने आज जिल्हा पुरवठा विभागात ठिय्या आंदोलन ( Today on behalf of Shiv Sena protest in district supply department ) करीत, गरिबांना तातडीने घोषणा केलेले साहित्य तत्काळ घ्यावेत, अशी मागणी केली.

गरिबांना राशन देण्याची मागणी - राज्य सरकारने दहा दिवसाआधी गरिबांना शंभर रुपयांत तेल, रवा, डाळ, साखर या वस्तू देईल, अशी घोषणा केली होती. परंतु, घोषणा केल्यानंतर ही अजूनपर्यंत गरिबांना राशन दुकानातून साहित्य मिळाले नाही. त्यामुळे शिवसनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ठिया आंदोलन करण्यात आले. जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासमोर शिवसैनिकांनी जोरदार नारेबाजी करीत, गरिबांना राशन देण्याची मागणी केली.

दोन दिवसांच्या आत गरिबांना राशन- राज्य सरकारने घाईघाईने घोषणा केली. मात्र, नियोजन केले नाही. गरिबांना दिलासा देण्याचा देखावा, राज्य सरकारकडून करण्यात आला. मात्र, कुठलेही नियोजन केले नाही. घोषणा करून राज्य सरकार गरिबांची खिल्ली उडवीत असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी केला आहे. दोन दिवसांच्या आत गरिबांना राशन व घोषणा केलेले साहित्य देण्यात यईल अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे यांनी दिले. ठेकेदाराकडून पुरवठा झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारने घोषणा केली, मात्र नियोजन शून्य.. या आंदोलन दरम्यान शिवसेनेकडून घोषणाजी झाल्या. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्याशी जिल्ह्याला अन्नधान्य पुरवठा करणारे सप्लायर यांच्याशी फोनवर बोलणं करून दिले. सप्लायर फोनवर बोलताना म्हणाले की, सरकारने घोषणा केली. मात्र, कुठलेही नियोजन नव्हतं. वेळीच घोषणा झाली असून सध्या रव्याचं मोठ्या प्रमाणात शॉर्टेज आहे. लवकरच मार्ग निघणार येत्या दोन दिवसात पुरवठा विभागाला किट पुरवल्या जातील, असे त्यांनी सांगितले. दरम्यान हा सप्लायर जालना येथील असल्याचे समजते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.