ETV Bharat / state

अकोल्यात शिवसेनेकडून इंधन दरवाढीचा विरोध; पेट्रोल पंपावर नागरिकांना वाटले चॉकलेट - Shiv Sena protest Ashok Vatika Chowk Akola

देशामध्ये ज्याप्रमाणे कोरोना वाढत आहे, त्याचप्रमाणे इंधन आणि गॅस सिलेंडरचे दर वाढत आहेत. केंद्र सरकार इंधन दरवाढ करून महागाईला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करीत शिवसेनेने आज अशोक वाटिका चौकातील पेट्रोल पंपावर इंधन दरवाढीविरोधात नारेबाजी करत केंद्र सरकारच्या विरोध केला.

Shiv Sena Chocolate Distribution Ashok Vatika Chowk
शिवसेना आंदोलन अशोक वाटिका चौक अकोला
author img

By

Published : Jun 8, 2021, 7:02 PM IST

अकोला - देशामध्ये ज्याप्रमाणे कोरोना वाढत आहे, त्याचप्रमाणे इंधन आणि गॅस सिलेंडरचे दर वाढत आहेत. केंद्र सरकार इंधन दरवाढ करून महागाईला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करीत शिवसेनेने आज अशोक वाटिका चौकातील पेट्रोल पंपावर इंधन दरवाढीविरोधात नारेबाजी करत केंद्र सरकारच्या विरोध केला. तसेच पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या वाहनचालकांना चॉकलेट वाटून केंद्र सरकार आश्वासनाचे चॉकलेट देत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

माहिती देताना शिवसेना शहर प्रमुख

हेही वाचा - संचारबंदीचा फटका : तीन एकरातील टरबूज शेतकऱ्याने फेकले रस्त्यावर

देशात पेट्रोलचे दर शंभर पार गेले आहे. त्यासोबतच डिझेलचे दरही वाढत आहे. ही दरवाढ केल्याने वाहतूकदारांकडूनही दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे, मालाची वाहतूक करण्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहे. हे सर्व पैसे व्यापारी ग्राहकांकडून काढत आहेत. त्यामुळे, महागाई वाढली आहे. परिणामी गरिबांना जगणे कठीण झाले आहे, असा आरोप करीत शिवसेनेने अशोक वाटिका चौकातील पेट्रोल पंपावर आंदोलन केले. केंद्र सरकारच्या विरोधात नारेबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही शेरेबाजी केली.

केंद्राने विकासाचे आश्वासन पाळले नाही

केंद्र सरकारने विकासाचे आश्वासन दिले होते. मात्र, केंद्र सरकारने ते आश्वासन पाळले नाही. पण, महागाई वाढवून देशवासियांची फसवणूक केली असल्याचा आरोप शिवसेनेने केला. केंद्र सरकारने ही दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या आंदोलनात शिवसेना शहर प्रमुख राजेश मिश्रा, अतूल पवणीकर यांच्यासह महिला आणि युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वाहनचालकांना वाटले चॉकलेट

पेट्रोल पंपवर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहनचालकांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चॉकलेट वाटले. ज्याप्रमाणे केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशवासियांना अश्वासनाचे चॉकलेट देतात, त्याचप्रमाणे त्यांनी इंधन दरवाढ कमी करण्याचे चॉकलेटरुपी आश्वासन न देता ते त्यांनी कमी करून दाखवावे, अशी मागणी शिवसैनिकांनी केली.

हेही वाचा - अकोल्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानेच फेक अकाऊंट बनवून पैशाची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.