ETV Bharat / state

Akola Shiv Sena Agitation : शिवसैनिकांनी जाळला कर्नाटक सरकारचा पुतळा; पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात

author img

By

Published : Dec 19, 2021, 7:10 PM IST

Updated : Dec 19, 2021, 7:19 PM IST

शिवसैनिकांनी ( Shiv Sainik ) आज (रविवारी) चांदेकर चौकात ( Chandekar Chowk Akola ) कर्नाटक सरकारचा प्रतिकात्मक पुतळा दहन ( Burning of Symbolic Statue of Karnataka Government ) केला. मात्र पुतळा दहन करण्याआधीच पोलिसांनी ते पुतळे ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शिवसैनिक आणि पोलीस यांच्यामध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. शेवटी पोलिसांचा विरोध झुगारत शिवसैनिकांनी पुतळ्याचे दहन ( Shiv Sainiks Burnt the Statue ) केले.

पुतळा दहन
पुतळा दहन

अकोला - कर्नाटक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे विटंबना ( Shivaji Maharaj Statue Defacement ) झाल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी ( Shiv Sainik ) आज (रविवारी) चांदेकर चौकात ( Chandekar Chowk Akola ) कर्नाटक सरकारचा प्रतिकात्मक पुतळा दहन ( Burning of Symbolic Statue of Karnataka Government ) केला. मात्र पुतळा दहन करण्याआधीच पोलिसांनी ते पुतळे ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शिवसैनिक आणि पोलीस यांच्यामध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. शेवटी पोलिसांचा विरोध झुगारत शिवसैनिकांनी पुतळ्याचे दहन ( Shiv Sainiks Burnt the Statue ) केले.

अकोला शिवसैनिकांचे आंदोलन

कर्नाटक सरकारचा विरोध करण्यासाठी शिवसैनिकांनी चांदेकर भवन येथे निषेध आंदोलन करण्याचे आयोजन केले होते. त्यानंतर शिवसैनिकांनी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्र्याचे प्रतिकात्मक पुतळा आणला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. यावरून पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये वाद झाला. शेवटी पोलिसांचा विरोध झुगारून शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळा दहन केले. पोलिसांनी जळलेला पुतळा विझविण्यासाठी प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. आंदोलन संपल्यानंतर पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेतले.

काय आहे प्रकरण?

कर्नाटकातील बंगळुरु येथे शुक्रवारी रात्री उशिरा संभाजी सर्कल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची अज्ञातांकडून विटंबना करण्यात आल्याचा प्रकार घडला. यावर बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमय्या यांनी अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या घटना होतच असतात असे वक्तव्य केल्याने शिवसैनिक अजूनही संतापले आहेत. या प्रकारामुळे शिवप्रेमी संतप्त झाले असून आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. त्याचसोबत या प्रकराची तीव्र निषेध विविध ठिकाणी आता केला जात आहे.

हेही वाचा - Gunaratna Sadavarte On ST Strike : विलनीकरणाचा लढा दाबून दाखवा; बारामतीतून सदावर्तेचे पवारांना आव्हान

Last Updated : Dec 19, 2021, 7:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.