अकोला - राज्यघटनेत आरक्षणाची मयार्दा ५० टक्के ठरवून देण्यात आली असतानाही भाजपप्रणित राज्य शासनाने संविधानाने दिलेल्या पळवाटांचा वापर करत नैतिकतेला हरताळ फासून हे आरक्षण ७५ टक्क्यांपर्यंत नेले आहे. या आरक्षणामुळे खुल्या प्रवगार्तील गुणवंत व हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. हे अतिरिक्त आरक्षण रद्द करण्यात यावे. या आशयाची मागणी घेऊन ‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’ मोर्चाच्या वतीने पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या घरासमोर शनिवारी सकाळी थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले.
या थाळी बजावं आंदोलनात शहरातील डॉक्टर्स, व्यवसायिक व अनेक संस्थांचे पदाधिकारी, नागरिक महिला पुरुष सहभागी झाले होते. या वेळी ‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’ च्या वतीने पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांना निवेदन देण्यात आले. राज्य शासनाच्या या अतिरिक्त आरक्षणामुळे गुणवत्ताधारक खुल्या विद्यार्थ्यांची गळचेपी होत आहे. छतीस हजार मेरिट लिस्ट नंबर असणाऱ्या विद्यार्थ्याला आरक्षणातून केएम मुंबई सारख्या नामवंत महाविद्यालयात अस्थिव्यंग या नामांकित कोर्सला प्रवेश मिळाला. चार हजार मेरिट लिस्ट क्रमांक असणाऱ्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कोणतीही जागा या मध्ये मिळत नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. गुणी व हुशार विद्याथ्यार्ची या आरक्षणा मुळे गळचेपी होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिक व वैद्यकीय क्षेत्रातील नागरिकांनी ‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’ च्या घोषणा दिल्या. या अतिरिक्त आरक्षण संदर्भात रस्त्यावर जनजागरण करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.