अकोला - १७ व्या लोकसभेतील मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा दिल्लीच्या राष्ट्रपती भवनासमोर पार पडला. यावेळच्या मंत्रिमंडळात अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे खासदार संजय धोत्रे यांना संधी देण्यात आली आहे. शपथविधीनंतर धोत्रेंच्या निवासस्थानी फटाक्यांची आतषबाजी आणि ढोलताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला. तसेच भाजप कार्यालयातही आनंद साजरा झाला.
यावेळी महाराष्ट्राच्या वाट्याला ७ मंत्रीपदे आली आहे. यामध्ये संजय धोत्रे यांची वर्णी लागली आहे. संजय धोत्रे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे हिदायत पटेल यांचा पराभव केला होता. त्यांनी प्रथमच मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.