ETV Bharat / state

पीएसआयच्या घरातच चोरट्यांनी मारला हात; पिस्तूल, जिवंत काडतुसासह दागिनेही लंपास

शहरातील गीता नगर भागातील आशिर्वाद अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाच्या घरी चोरट्यानी हात साफ केल्याची घटना घडली आहे.

पीएसआयच्या घरातच चोरी
author img

By

Published : Jul 21, 2019, 3:59 PM IST

Updated : Jul 21, 2019, 5:09 PM IST

अकोला - शहरातील गीतानगर भागातील आशिर्वाद अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाच्या घरी चोरट्यानी हात साफ केल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी एक ०९ एमएम पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसासह ६० हजार रुपयांचे दागिने लंपास केले. ही घटना रविवारी सकाळी साडेअकरा वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे चोरट्यांनी पोलिसांनाच आव्हान दिले आहे.

पीएसआयच्या घरातच चोरी

राजेश नानाजी जोशी, असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. राजेश जोशी हे अकोला पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याने ते रात्री रुग्णालयात होते. दरम्यान, सकाळी साडेअकरा वाजता घरी आले असता घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त दिसून आले. कपाटातील ६० हजार किमतीचे दागिने आणि एक सरकारी ०९ एमएम पिस्तूलासह १० जिवंत काडतुसे चोरट्यांनी लंपास केली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, शहर उपविभागीय पोलीस अधीक्षक उमेश माने पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांच्यासह जुने शहर पोलीस अधिकारी आणि तपास वाहन, ठसे तज्ञ, श्वान पथक हे सर्वजण जोशी यांच्या घरी दाखल झाले. जुने शहर पोलीस ठाण्यात भादंवि ४७७, ३८०, या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलीस विभागालाच चोरट्यांनी आव्हान दिले आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी पीएसआय जोशी यांची चांगलीच कानउघाडणी केल्याचे समजते.

Intro:अकोला - जुने शहरातील गीता नगरातील आशीर्वाद अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाच्या घरी चोरट्यानी हात साफ केला आहे. चोरट्यांनी एक 09 एमएम पिस्तूल आणि दहा जीवन्त काडतुससह 60 हजार रुपयांचे दागिने लंपास केले. ही घटना आज सकाळी साडेअकरा वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे चोरट्यांनी पोलिसांनाच आव्हान दिले आहे. Body:अकोला पोलिस दलात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक राजेश नानाजी जोशी हे कार्यरत आहेत. ते जुने शहर गीता नगरातील आर्शिवाद अर्पाटमेन्टमध्ये राहतात. त्यांच्या पत्नीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यानिमित्ताने ते रात्री रुग्णालयात होते. ते सकाळी साडेअकरा वाजता घरी आले असता घरातील सर्व साहित्य अस्तव्यस्त दिसून आले. कपाटातील 60 हजार किंमतीचे दागिने आणि एक शासकीय 09 एमएम पिस्तूल आणि दहा जीवन्त काडतुस चोरट्यांनी लंपास केला आहे. हा प्रकार पाहून पोलिस अधीक्षक अमोघ गावकर, अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, शहर उपविभागीय पोलिस अधीक्षक उमेश माने पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांच्यासह जुने शहर पोलिस अधिकारी आणि इन्व्हेष्टींगेशन कार, ठसे तज्ञ पथक, श्वान पथक घरी दाखल झाले. जुने शहर पोलिस ठाण्यात कलम ४७७, ३८०, भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलिस विभागालाच चोरट्यांनी आव्हान दिले आहे.

पोलिस अधीक्षकानी दिली भेट
पोलिस उपनिरीक्षक राजेश जोशी यांच्या घरी झालेल्या चोरीनंतर पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांनी भेट दिली. त्यांनी पीएसआय जोशी यांची चांगलीच कानउघाडणी केली. Conclusion:
Last Updated : Jul 21, 2019, 5:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.