ETV Bharat / state

Ravikant Tupkar: सरकारच्या खुर्चीला आग लावणारे आंदोलन करू - रविकांत तुपकर - buldhana Ravikant Tupkar

कापूस आणि सोयाबीन पिकाला भाव देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करून न्यायालयीन कोठडीत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह 25 जणांची आज सकाळी अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहातुन जामिनीवर सुटका झाली.

Ravikant Tupkar
रविकांत तुपकर
author img

By

Published : Feb 16, 2023, 1:13 PM IST

Updated : Feb 16, 2023, 2:09 PM IST

सरकारच्या खुर्चीला आग लावणारे आंदोलन करू

अकोला: या आंदोलनात जे लोक नव्हते त्यांनाही गोवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. खोट्या केसेस आमच्यावर दाखल करण्यात आलेले आहेत. गंभीर गुन्हे आमच्यावर लावण्यात आलेले आहेत. त्यांना वाटत की चळवळ मोडून काढू आणि आंदोलन होणार नाही. पण मी यांना सांगू इच्छितो जेवढं तुम्ही आम्हाला दाबण्याचा प्रयत्न कराल त्याच्यापेक्षा जास्त ताकदीने आम्ही भविष्यात आंदोलन करू. पुढचे आंदोलन हे आर या पार असेल. सरकारच्या खुर्चीला आग लावणार असेल. तुम्ही आम्हाला तुरुंगात टाका. आम्ही आंदोलन करणार. आम्ही हक्कासाठी रस्त्यावर उतरणार, असा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

कारागृहातुन जामिनीवर सुटका: कापूस आणि सोयाबीन पिकाला भाव देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करून न्यायालयीन कोठडीत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह 25 जणांची आज सकाळी अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहातुन जामिनीवर सुटका झाली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. पुढे ते म्हणाले, यावेळी कारागृह परिसरात रविकांत तुपकर यांचा त्यांची आई, पत्नी व बहिणीने औक्षत केले. यावेळी इतरही शेतकरी यांचे हारफुल घालून सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.

आत्मदहनाचा प्रयत्न केला होता: बुलढाणा येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून 10 फेब्रुवारीला आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. पोलिसांच्या वेशात रविकांत तुपकर हे आत्मदहन करण्यासाठी आले होते. पीक विमा कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप यावेळी तुपकरांनी केला होता. प्रीमियम भरूनही शेतकऱ्यांना अत्यल्प मदत देऊन शेतकऱ्यांची थट्टा होत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसल्याचा आरोप ही त्यांनी केला होता.

राज्य सरकारचा निषेध केला: आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतर रविकांत तुपकर यांच्यासह 25 आंदोलनकांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांना 15 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनविण्यात आली होती. रविकांत तुपकर यांची अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली यावेळी यांच्या पत्नी आणि आईने औक्षण केले. तर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत राज्य सरकारचा निषेध केला. यावेळी त्यांची मिरवणूक ही काढण्यात आली.

अधिक तीव्र आंदोलना इशारा: या वेळी रविकांत तुपकर यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी यापुढेही आंदोलन करू तर सरकारने याची दखल न घेतल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा यावेळी त्यांनी दिला. राज्य सरकार शेतकऱ्याना गुन्हेगार समजून गंभीर गुन्हे दाखल करिते. हा प्रकार म्हणजे, शेतकऱ्यांना गुन्हेगारांच्या भूमिकेत पाहणाऱ्या राज्य सरकारच्या निषेध करतो. राज्य सरकारला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला.

कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर ठरणार पुढील दिशा: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा येथे गेल्यानंतर शेतकऱ्यांची बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठेवण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये सरकारशी लढाई आम्ही करणार आहोत. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही आंदोलन करीत आहोत. आमच्या आंदोलनामुळे सरकारला जागे करण्याचा आमचा प्रयत्न राहील, अशी माहिती रविकांत तुपकर यांनी दिली.

हेही वाचा: Ravikant Tupkar Buldhana रविकांत तुपकरांच्या अडचणीत वाढ न्यायलयाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Last Updated : Feb 16, 2023, 2:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.