ETV Bharat / state

राष्ट्रवादी केव्हाही भाजपसोबत जाऊ शकते, त्यांच्यासोबत युती न केलेलीच बरी - अ‌ॅड. प्रकाश आंबेडकर - एमआयएम

शासकीय विश्रामगृह अकोला येथे पत्रकार परिषद आयोजीत करण्यात आली होती. यावेळी बोलतांना अ‌ॅड. प्रकाश आंबेडकरांनी विविध पक्षासोबत युती संदर्भातील मोठी माहिती दिली आहे.

प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Aug 29, 2019, 5:07 PM IST

अकोला - आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी कधीही भाजपसोबत जाऊ शकते. त्यामुळे त्यांच्यासोबत युतीचा विचार न केलेलाच बरा, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‌ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे.

प्रकाश आंबेडकरांची पत्रकार परिषद

शासकीय विश्रामगृह अकोला येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना अ‌ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्हाला वैचारीक स्पष्टता हवी आहे. आम्ही राष्ट्रवादीला युतीच्या माध्यमातून निवडून आणावे आणि त्यानंतर त्यांनी भाजपला मदत करावी. यापेक्षा राष्ट्रवादीने स्व:बळावर निवडून यावे आणि हवा तो निर्णय घ्यावा. हे कधीही चांगले, अशी आमची भूमिका आहे. यामुळे आम्ही आगामी विधावसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीला गृहीत धरलेलेच नाही, असा टोला त्यांनी लगावला. तर सत्ता उपभोगायची आणि सत्ता उपभोगताना रडायचे, हा तमाशा लोकांच्या लक्षात आलेला आहे. योग्य वेळेस लोक या तमाशाला उत्तर देतील, असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला.

दरम्यान, एमआयएमसोबत आमची युती होणार आहे. त्यांच्यासोबत आमचे सर्व व्यवस्थित सुरु आहे. एमआयएम पक्षातील सर्व निर्णय असदुद्दीन ओवैसी घेतात. त्यामुळे आम्हाला त्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही, असे आंबेडकर यावेळी म्हणाले. या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, राजेंद्र पातोडे, धैर्यवर्धन पुडकर, बालमुकुंद भिरड, ज्ञानेश्वर सुलताने, माजी आमदार हरिदास भदे, प्रा. प्रसन्नजीत गवई हेदेखील उपस्थित होते.

Intro:अकोला - राष्ट्रवादीही भाजप बरोबर आहे. त्यामुळे आम्हाला वैचारिक क्लारिटी हवी आहे. राष्ट्रवादीही भाजपवर केव्हाही जाऊ शकते, घणाघाती आरोप यांची बहुजन आघाडीचे एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज केला.

Body:शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होती. पुढे ते म्हणाले, त्यामुळे आम्ही त्यांना निवडून आणायचे अन त्यांनी भाजप बरोबर जायचं. यापेक्षा त्यांनी निवडून यावे आणि त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा, ही आमची भूमिका असल्याचे ते म्हणाले. आम्ही राष्ट्रवादीला गृहीत धरत नसल्याचाही टोला एड. आंबेडकर यांनी मारला.
एमआयएम बरोबर आमची होणार. ती कधी ताणले गेलेले नाही. एमआयएम मधील निर्णय घेण्याची प्रक्रियाही असदुद्दीन ओवेसी घेणार. त्याच्यामुळे त्यांच्या पक्षात काय चालले आहे, याकडे आम्ही लक्ष देत नाही. ओवेसी यांच्या सोबत आमचे संबंध चांगले आहे. आमची युती होणार असे वंचित बहुजन आघाडीचे नेते एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी सूतोवाच केले. या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, राजेंद्र पातोडे, धैर्यवर्धन पुडकर, बालमुकुंद भिरड, ज्ञानेश्वर सुलताने, माजी आमदार हरिदास भदे, प्रा. प्रसन्नजीत गवई यांच्यासह आदी उपस्थित होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.