ETV Bharat / state

'भंडाऱ्यातील घटनेची जबाबदारी स्वीकारून आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा' - प्रकाश आंबेडकर राजेश टोपे राजीनामा मागणी

शनिवारी मध्यरात्री दोन वाजता भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवजात केयर युनिटमध्ये (SNCU) आग लागली. यात आऊट बॉर्न युनिटमधील 10 बालंकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Jan 9, 2021, 1:19 PM IST

अकोला - भंडाऱ्यातील घटना दुर्दैवी आहे. राज्य सरकारचे 'वरातीमागून घोडे' अशी गत आहे. एखादी शासकीय वास्तू उभी केल्यानंतर तिचे ऑडिट झाले पाहिजे. मात्र, आपल्याकडे हे नियमीतपणे होत नाही. भंडारा शासकीय रुग्णालयाच्या देखभालीची जबाबदारी ज्या अधिकाऱ्याकडे होती त्यांनी आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी प्रकाश आंबेडर यांनी केली

भांडारा येथील सामान्य रुग्णालयात दहा बालकांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेबाबत देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. इमारतींचे बांधकाम सरकार करते. नियमाप्रमाणे त्याचे ऑडिट व्हायला पाहिजे. मात्र, ऑडिटसाठी खर्च होतो. त्यामुळे ऑडिट टाळले जाते. मात्र, त्याचा परिणाम म्हणून अशा दुर्दैवी घटना समोर येतात. यामध्ये सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागतो. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर, अशा घटना वारंवार होतील, असेही आंबेडकर म्हणाले.

काय झाले भंडाऱ्यात -

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवजात केयर युनिटमध्ये (SNCU) आग लागली. या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. शनिवारी मध्यरात्री दोन वाजता ही आग लागली. SNCU मध्ये एकूण 17 नवजात बालके होती. या विभागामध्ये आऊट बॉर्न आणि इन बॉर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी इन बॉर्नमधील सात बालके सुखरूप आहेत. तर आऊट बॉर्न युनिटमधील 10 बालंकांचा मृत्यू झाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.