अकोला - बिहार निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू आणि इमेज चालली नाही हे निकालावरुन दिसत आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर केली आहे. जसे घवघवीत यश अगोदर त्यांना मिळायचे, ते बिहारमध्ये मिळाले नाही. 1990ची मिलिजुली सरकारची परिस्थिती होती, ती पुन्हा सुरू झाली आहे असे दिसते, असा आरोपही आंबेडकर यांनी केला आहे.
बिहार निवडणूक निकाल : मोदी यांची जादू कमी झाली - प्रकाश आंबेडकर - criticism on congress by prakash ambedkar
बिहार निवडणुकीमध्ये मोदींची जादू आणि इमेज चालली नाही, हेच निकालावरुन दिसत आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर केली आहे.
प्रकाश आंबेडकर बिहार निवडणुका
अकोला - बिहार निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू आणि इमेज चालली नाही हे निकालावरुन दिसत आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर केली आहे. जसे घवघवीत यश अगोदर त्यांना मिळायचे, ते बिहारमध्ये मिळाले नाही. 1990ची मिलिजुली सरकारची परिस्थिती होती, ती पुन्हा सुरू झाली आहे असे दिसते, असा आरोपही आंबेडकर यांनी केला आहे.
बिहार निवडणूक निकालांवरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहीजणांनी या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे तर, काहींनी मोदींवर टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर टीका करतानाच काँग्रेसलाही लक्ष्य केले आहे. 'डेमोक्रॅटिक फ्रंट आणि एमआयएम या पक्षांना 'वोट काटनेवाले पक्ष' असे संबोधतात त्यावरुन त्यांनी कॉंग्रेसवरही टीका केली आहे. वोट काटनेवाली पार्टी हा नारा आरजेडीलाही लागू झाला असता', अशी टीकाही आंबेडकरांनी केली आहे.