अकोला - पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने अकोट फाईल येथील अशोक नगर आणि नाजुक नगर येथील जुगारावर आज २२ जानेवारीला छापा टाकला. यामध्ये १ लाख ३४ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विशेष पथक शहरात गस्त घालत असताना त्यांना जुगार अड्ड्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी छापा टाकला. यामध्ये किशोर मोहनलाल भुतडा, नरेंद्र नामदेव मालठाणे, पुंडलिक तुकाराम मोहिते, शेख रिहाण शेख मेहबूब, मेहबूब खान शेर खान, मोहम्मद सलीम मोहम्मद रफिक तसेच व्यवसाय मालक उरमान शाह रुखमान शाह यांच्याविरुध्द अकोट फाईल येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नाजुक नगर येथील मोर्णा नदीच्या पात्रातील जुगार अड्ड्यावर देखील छापा टाकला. यामध्ये शेख तैसीम शेख मेहबूब, शेख राजू शेख हाजी कासम, शेख चांद शेख मुन्ना चौधरी, अजहररुद्दीन हफिजोद्दीन, शेख रहमान शेख जब्बार, वहीद खान रहीमखान, तसेच व्यवसाय मालक शेख रशीद शेख सुलतान पहेलवान, शेख फईम रानाजीम यांच्या विरुद्ध रामदास पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही कारवाईमध्ये एकूण १ लाख ३४ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.